Sunday, October 12, 2025

हिंजवडी, कॅब आणि प्रवासी

 

हिंजवडी, कॅब आणि प्रवासी


हिंजवडी च्या  IT कामगारांना रिक्षा आणि टॅक्सी वाल्यांनी अव्वा च्या सव्वा पैसे लावून अनेक वर्षे लुटले. 1 km यायलां 500 /- 800/- असे. जे काही आकडे मनाला येतील ते हे लोक सांगत. अडला हरी म्हणत लोक नाईलाजानं अडचणीच्या वेळेस त्यात बसत. Pmt ने AC busses चालू केल्या होत्या, पण त्याचे टायमिंग कुठेही बस थांब्यांवर नाही. सगळ्या route वर  ह्या गाड्या नाहीत. त्यामुळे ज्या बसेस जातात त्यात लोंबकळत जाण्या शिवाय पर्याय नाही. बऱ्याच कंपनी स्वतः च्या बस services देतात. मात्र ह्या नवीन बस मध्ये देखील इतक्या छोट्या सीट्स आहेत, की फक्त अतिशय बारीक लोकांना त्या सोयीच्या आहेत. उरलेल्या जागा उभे राहून प्रवासासाठी. आता हिंजवडी ला जाणाऱ्या कर्मचारीवर्गा मध्ये 40 वर्षाच्या वरचा बराच वर्ग आहे, जो बस च्या ब्रेक च्या  हाद्र्याना सहन करण्याच्या पलीकडे गेला आहे. बसून कामा मुळे अनेकांना गुडघे दुःखी आहे. 


जो route pmt साठी अतिशय फायदेशीर असायला हवा, तिथे इतक्या कमी गाड्या आहेत आणि 6 सिटर( ह्यांना 6 सीटर का म्हणावे हा मोठा प्रश्न आहे. कारण एका गाडीत किमान 12 जण कोंबेलेले असतात) मात्र दर 2-3 मिनिटांनी सुटतात. जर सोयीच्या बसून जाता येणाऱ्या बसेस असतील तर हेच लोक बस ने का नाही प्रवास करणार? This is a very good business case for them. कारण काय तर मग 6 seater वाले आंदोलन करणार. जर ह्याच 6 seater वाल्यांना पण pmt च्या ड्रायव्हिंग चे ट्रेनिंग दिले तर ते लोक ही आनंदाने जॉब करतील व लोकांना सोयीच्या बसेस उपलब्ध होतील. 


प्रवाशांना कंपनी ची बस चुकली तर दुसरा पर्याय नाही. त्यात रस्ते इतके खराब की स्वतः च्या  गाड्या चालवत येणें सर्वानाच जमणे शक्य नाही.  बस ची योग्य हमखास बसून 25 km येण्याची सोय नाही  त्यामुळे त्यांना हे ॲप बुडत्याला काडीचा आधार ठरले 


पण सगळ्याच ॲप मध्ये ride book करण्याच्या सोयी अजून पुरेश्या नव्हत्या. फीडबॅक ची सिस्टीम नीट नाही. ड्रायव्हर ने extra पैसे मागीतले तर तक्रार करण्याच्या सोयी नाहीत. 


आता आपण टॅक्सी व रिक्षा कडे वळू. ज्यावेळी टॅक्सी वाल्यांचे व रिक्षा वाल्यांचे extortion चालू होते, हो extortion च,  कारण एखादा रिक्षा वाल्यांनी मीटर प्रमाणे यायची तयारी दाखवली, तर बाकीचे युनियन वाले त्याला दमदाटी करत. 


त्या नंतर ओला उबर चे दिवस आले. बहुतांश त्रासलेल्या लोकांनी मोकळा श्वास घेतला. कारण आता गाडीत बसण्या पूर्वी तुम्हाला माहित असते की तुम्ही किती पैसे देणार आहात. पटले तर या. मग रपिडो, sride असे अनेक लोक आले. ड्रायव्हर ना आणि प्रवाशांना वेगवेगळे ऑप्शन्स उपलब्ध झाले. पण प्रत्येक बिझनेस मध्ये असते तशी कॉस्ट optimisation ची चढाओढ इथेही सुरू झाली. अनेक ड्रायव्हर्स नी नवनवीन गाड्या घेऊन गब्बर पैसे ही कमावले, शिवाय extra गाडी घेऊन इतर ड्रायव्हर पण कामावर ठेवले. दुसऱ्यांच्या गाडी वर काम करणारे ड्रायव्हर व मालक ह्यांच्या शेअर मध्ये आता चढाओढ होऊ लागली. मग ओला चे भाडे त्यांना परवडेनासे झाले. 


मग ह्या लोकांनी आंदोलन केले. Rto ने नियम केला की हे लोक 25/-  km प्रमाणे भाडे घेऊ शकतील. पण 25 रू सरसकट की बेसिक काही km नंतर ह्याची,  नियमावली नाही. ह्या टॅक्सी ना मीटर नाही. रिक्षाला जर मीटर आहेत तर टॅक्सीला मीटर कम्पल्सरी का नाहीत? मुंबईत मीटर शिवाय टॅक्सी दिसत नाही. मग पुण्यात टॅक्सी लां मीटर का नको?


मीटर लावले तर RTO कडे  पण hya गाड्याची नोंद होऊ शकते व टॅक्सी वाल्यांना पण भाडे मिळू शकते. इथेच ग्यांनबाची मेख आहे. 


कारण मीटर लावले तर जवळचे भाडे नाकारता येणार नाही. ह्या सर्वांना हिंजवडी, खराडी, मगरपट्टा असे लांबचे IT वाले भाडे हवे आहे. पण ही माणसे शोधायची कशी? त्यामुळे आम्ही ओला किंवा उबर चेच भाडे घेतो हे सांगून जवळ चे  भाडे  नाकारणे सोयीचे ठरते. 


उबर आणि ओला मध्ये सकाळच्या वेळी ऑफिस ला जायचे भाडे येताना च्या भाड्याच्या दीड पट आहे. कारण कमी भाडे घेऊन टॅक्सी वाले इतक्या लांबचे गिऱ्हाईक सोडायला तयार नाहीत. हीच तर कमवायची त्यांची संधी आहे. लोकांना ही मीटिंग ची वेळ गाठायची तर घे बाबा 2 पैसे जास्त पण  वेळे वर सोड आम्हाला अशी घाई असते. 


पण येताना एकतर ऑफिस सुटे पर्यंत थांबा नाही तर रिकामे परत या, त्यामुळे परत येताना चे भाडे कमी देऊन ही हे लोक यायला तयार होतात.  


आता मात्र त्यांना दिसते की उबर सकाळी जास्त पैसे लावते, दुपारी कमी लावते पण दोन्ही वेळेला ड्रायव्हर ल मात्र तेवढेच पैसे मिळतात. त्यामुळे त्यांची ओरड आहे 


म्हणजे ओला उबर ड्रायव्हर ना उबर चे गिऱ्हाईक तर हवे आहे पण भाडे मनमानी हवे आहे. शिवाय मीटर पण नको. म्हणजे आखूड शिंगी, बहुदुधी बहु गुणी गाय हवी आहे.


त्यामुळे सद्ध्या टॅक्सी चालकांचा नवीन फंडा आला आहे.


लांबचे गिऱ्हाईक शोधणे जिकिरीचे. त्यामुळे ॲप वर रजिस्टर करायचे. ॲप मार्फत गिऱ्हाईक हेरायचे. मग ॲप मधून च प्रवाशाला फोन करायचा की आणि ॲप प्रमाणे नाही km प्रमाणे पैसे घेऊ. जे आवा च्या सव्वा आहेत. बरं त्यांना विचारले तुमच्या कडे मीटर आहे का? तर नाही. RTO ने meter न लावता गूगल वरची एक बातमी दाखवून आम्हाला मीटर प्रमाणे म्हणजे नसलेल्या मीटर प्रमाणे भाडे घ्यायची परवानगी दिली आहे म्हणे. ह्या केस मध्ये ड्रायव्हर ची credibility किती? बॅकग्राऊंड चेक झाला आहे का? तो माणूस safe आहे का? ह्याची कुठलीच गॅरंटी प्रवाशाला नाही. त्यामुळे गुन्ह्यांचे प्रमाण देखील वाढत आहे. एखादा ड्रायव्हर regular Ola, Uber chya rate ने येतो ही. पण नंतर त्याला बाकीचे लोक धमकवतात व पुढच्या वेळेस तोच ड्रायव्हर extra पैसे मागतो. हे चक्र चालूच आहे. जगजाहीर आहे. मात्र ह्यावर गेल्या अनेक वर्षात कुठलेही ठोस उपाय नाही.


ह्या सर्वावर PMT, RTO, local corporaters, कंपन्या ह्यांनी तोडगा काढायला हवा. टॅक्सी ल पण officially मीटर बसवावे. उबर, ओला  rate आणि मीटर मध्ये फार तफावत असता कामा नये, मुख्य म्हणजे बसून प्रवास करता येतील अशा बसेस वाढवांयला हव्यात, AC bus सुद्धा लोक आनंदाने वापरतील पण बसायची सोय हवी. उभे राहून नको 


कोणी ह्यावर विचार करतील काय?


- सुवर्णा 

- 3-Oct-2025

Thursday, August 22, 2024

Noise and Festivals

 Noise and Festivals


I am part of whatsapp groups of couple of societies and many other groups of family  and friends. I keep reading all these mssages for some time about loud noise of practice sessions of dhol tasha pathaks in each society and many members raise complaints about noise.


In many cases once the practice session of one team finshes, immediately another team starts practising from different direction. The societies surrounded by other societies and crowded area are vulnerable to this huge noise polution and feel helpless. I know few of my relatives literally takeleaves during festive seasons of processions and travel to some quiet place nearby for couple of days.


I think it is high time we need to rethink about the connection of any celebrations and high noise.


Does making only high noise can give us happiness? What is the purpose of the holidays? Praying for bhagwan Ganesha or Devi Maa or celebrating with each other with colors etc is expected during these festivals. Where does this sound and noise come into picture?


Does any of our ved - Puran talk about making noise? If arati happens, it happens for maximum 30 min to one hour. If garba or dandiya happens it happens for say 1 -2 hrs. Is it said somewhere that garba or dandiya has to be played on loud speakers?


We have technology at hand.  If we have closed halls, it is wise to use it or if we have large open grounds we can use loud speakers.However, in closed societies?? Is it really wise?


We don't care about patients, we don't care about aged people, infants, pets, pregnant women. We don't care even about people working from home. It is not our agenda of empathy for whom we need to show empathy the most. Then who do we celebrate these festivals for? If so many people are wishing for your festivals to get over asap so that they can live peacefully, then is it for the betterment of mankind? 


Lokmanya Tilak started these festivals to unite people, but every few days a new festival and new highs of decibal levels are establishing. It is actually dividing people and taking new generation away from this show business.


Kindly request all, can we please rethink about why in first place we have these festivals? We should arrange lectures of learned people for knowing the scripts, knowing history behind the festivals, arrange quizes for new generation about festivals, or ask about culture related basic questions on why and what, part of the festival. 


How many  of us can tell how many "Patri s " are used for Gansh pooja and what is the significance and use of each plant? Does our kids know about it?  Arrange kirtan and pravachan on various rituals, festivals, and let the people know the background of festival. Earlier days after every pooja there used to be "kahani/katha" to know the background of the pooja 

and every member of the house used to gather for the katha. If we have to practice something for two months, make sure everyone knows correct words and rhythm of arati, learn some suktas together, use this time for reciting and memorising geeta adhyays, if not done already, recite Atharvasheersha and mke sure all kids in,society can recite it together wih right pronouciation. During festival days make sure we can explain meaning of the suktas and Atharvasheersha too.


It is good sign that we are movig towards sustainable Ganesh pooja and homemade idol or recycling the soil. Still we can avoid large idols being immersed in the waterbodies. We can make use of preparatiin days to plant Patris /medicinal and pious plants near and around society. Giving a list of patri for reference. 


The number 21 holds great significance in Ganesh puja, and the authentic patris consist of leaves from Terminalia arjuna (Arjun), Sesbania grandiflora (Agati), Achyranthes Aspera (Prickly Chaff Flower), Nerium Indicum (Oleander), Pandanus odoratissimus (Kewda), Jasminum auriculatum (Juhi), Punica granatum (Pomegranate), Solanum indicum (Indian nightshade), Cynodon dactylon (Bermuda grass), Cedrus deodara (Deodar), Ocimum sanctum (Holy basil), Datura innoxia (Datura), Ficus religiosa (Holy Ficus), Aegle marmelos (Bel), Ziziphus mauritiana (Ber), Origanum majorana (Marjoram), Eclipta erecta (False Daisy), Jasminum sambac, Evolvulus alsinoides, Calotropis procera (Rubber bush), and Prosopis spicigera (Khejri tree).


In Marathi 

गणपती पूजेसाठी लागणारी फुले व पत्री

फुले:

१. लाल कमळ

२. मंदार

   ३.चाफा

४. केवडा

५. गोकर्ण

६. जाई

७. जास्वंद

८. शेवंती

९. गुलाब

१०. पारिजातक

पत्री

१. मोगरा

२. माका

३. बेलाचे पान

४. पांढर्या दुर्वा

५. बोरीचे पान

६. धोत्र्याचे पान

७. तुळस

८. शमी

९. आघाडा

१०. डोरली

११. कण्हेर

१२, रुई

१३ अर्जुन सादडा

१४ विष्णुक्रांता

१५. डाळिंब

१६. देवदार

१७. पांढरा मारवा

१८. पिंपळ

१९. जाई

२०. केवडा

२१. अगस्ति पत्र

Hence, coming back to noise. We should have only traditional instruments like Dhol Tasha,  Halgi, Sambal, Lezim in Ganesh Festival. That too in limited number. Based on open area, how much voice and noise will be collectively produced has to be considered, DJ must be banned.


In my humble opinion, if we are celebrating at the cost of peace, health and career of so many factors in society then we may have to rethink about why we are celebrating in first place. 


It is hightime we need to change the ways of celbrating festivals as we are a "parivartanshil" society and dharma.


-Suwarna

23-Aug-2024

Thursday, August 15, 2024

हिंदू नामशेष होतोय का?

 हिंदू नामशेष होतोय का?

सध्या एक लेख खूप फिरतोय कि पन्नास वर्षात हिंदू नामशेष होतील. अर्थात ह्या अर्थाचे बरेच लेख आता येत आहेत व लोकांना जाणीवा होत आहे की अमुक तमुक तर त्यांच्या धर्मग्रंथात च सांगितले आहे. व त्यांचा समाज अपरिवर्तनशील आहे, त्यामुळे आपले काही खरे नाही. बर्याच वेळेला शेवटी रोख दिसतो की आता एकच राष्ट्रपुरुष यातून आपल्याला वाचवू शकेल. वरील उल्लेख केलेला लेख त्याच धर्तीचा आहे.


 लेख योग्य मात्र उपाय योजना खूप खिळखिळी आहे. एक राष्ट्रपुरूष या एकाच कल्पने व्यतिरिक्त दुसरा उपाय देखील सुचवलेला नाही.


मोदी सांगतील थाळ्या वाजवा, तुम्ही वाजवाल. मोदी सांगतील मी अमुक कायदा करीन, तुम्ही मान डोलवाल, पुढे काय?


मी स्वतः काय करायला हवे याची योजनाच नाही. मुसलमान काय करतात याचा दांडगा अभ्यास आहे. मी रोज गीता वाचावी का? मी पण दहा पोरे जन्माला घालावीत का? मी चार मुले जन्माला घालून त्यातील दोन compulsory सैन्यात पाठवावी का? मी जागोजागी सभा घेऊन हिंदूना गोळा करावे व पोरांना कामधंदे उभारण्याचे प्रशिक्षण द्यावे का? माझ्या आजूबाजूला घडणार्या प्रत्येक गोष्टींमधून समाजबांधणी व कार्यमग्नता व त्यासाठी लागणारे कौशल्य उभे करावे का? आणि कसे? इथे गणेशोत्सवातील हार, फुले, फळे व सजावटीचे सामान पण मुसलमान लोक विकत आहेत व पैसा कमवत आहेत. पण हिंदू पोरांना या सणांचा देखील उपयोग करून परमार्था बरोबर   चरितार्थाचे काय काय उपाय करता येतील यावर विचार करण्यात रस नाही किंवा कोणी त्या दृष्टीने पुढाकार घेत नाही. सगळा भर मोठमोठे ढोल ताशे किंवा डाॕल्बी च्या भिंती बांधून अमाप कानठळ्या बसणारा आवाज करणे व वेडेवाकडे अंगविक्षेप करत नाचणे, यावरच दिसतो. 


समाजाला धर्म हवा आहे पण त्याच बरोबर अर्थार्जन, दळणवळण, अन्नधान्य, व्यापार, रोजगार ही हवा आहे. हे सर्व करण्यासाठी team हवी. ती टीम प्रत्येक स्तरावर कार्यरत हवी व हे विचार एक समान प्रसारीत करणारी हवी. त्या साठी मात्र एकटे मोदी कुठे पुरे पडणार?


निष्क्रिय व समाज विभागणार्या माणसांना राज्यस्तरीय नेतृत्व, गणेशोत्सव सारख्या कार्यक्रमांसाठी दोन तीन महिने तयारी च्या नावाखाली ध्वनी प्रदूषण व पुढे रस्त्यांची नासधूस, आणि मग गणेशोत्सवाला परवानगी दिली तर इतरांना का नको ह्या नावाखाली टिळक जयंती किंवा त्याऐवजी अण्णाभाऊ साठे जयंती, आंबेडकर जयंती, दहीहंडी व इतर सतराशे साठ उत्सवात नाचणारी प्रजा तयार करणे व त्यातच धन्यता मानणे, अजानच्या भोंग्याचा सर्वांना त्रास होतोच. मात्र ते जेव्हा प्रतिप्रश्न करतात की तुमच्या उत्सवात रात्रंदिवस लाऊड स्पीकर लागतात तेव्हा त्रास होत नाही का तर आपल्या कडे उत्तर नसते. आपण कामधाम सोडून वेडेवाकडे नाचणारी प्रजा तयार करत आहोत व त्यांचा सतरंज्या उचलायला व सर्वच पार्ट्यांना फंड गोळा करायला उपयोग होतो म्हणून तेरी भी चूप मेरी भी चूप. लोकमान्य टिळकांनी त्याकाळी गणेशोत्सव सुरु केला कारण अख्खा गाव एकत्र करायचा होता. पण तुम्ही तर गल्लोगल्ली गणपती बसवून गावाचे सतराशे साठ तुकडे व प्रदुषणच केले राव!! मग हा गणेशोत्सव ह्याच स्वरुपात करत रहायचा कि तो आता बदलायला हवा? 


प्रजा रस्त्यातील खड्ड्यांमुळे गांजली आहे. वर्षानुवर्षे चालणाऱ्या मेट्रो व फ्लाय ओव्हरच्या कामांनी गांजली आहे. आपला टॕक्स चा पैसा लाडक्या बहिणी आणि दोडक्या भावांवर उधळताना पाहून चिडली आहे, हताश झाली आहे. राज्यात फक्त फोडा आणि राज्य करा असल्या किडक्या मनोवृत्ती च्या राज्यकर्त्यांची चलती आहे. 


विरोधात असणार्या एकेक हिंदू नेत्याच्या नावाने शंख करत त्यांचे अमुक व त्यांचे तमुक  करत त्यांच्या खिडकीतून डोकावून डोकावून टीकास्त्र सोडत आहेत, म्हणजे एकेकटे गाठा व मारा ही रणनीती आहे. ते असे म्हटले, त्यांनी अमुक तमुक चा निषेध केला नाही, त्यांनी तमुक तमुकला नावे ठेवली. एक ना दोन. 


मात्र कुठल्याही मुसलमान नेत्याच्या नावानिशी त्यांनी अमुक तमुक केले आहे, त्यांचा विरोध करा ही भाषा नाही. का? त्यांची नावे घेताना भिती वाटते? तोरसेकर आणि आनंद देवधर कुठल्याही मुसलमान नेत्यांविषयी नावांनिशी चिरफाड करणारे व्हिडियो व ब्लाॕग टाकताना दिसत नाहीत. का?असे वाटते, त्यांना हिंदूंना एकजूट करण्यात नाही तर त्यांच्या मधे फूट पाडण्यात जास्त स्वारस्य आहे. 


शोधा ना परकीय!! करा त्यांची नावांनिशी चिरफाड. परदेशातील सोरोस पेक्षा देशातील जे मुल्ला मौलवी जे चिथवत आहेत त्यांचे नावानिशी सार्वजनिक निषेध करून दाखवा. ती हिम्मत नाही आपल्या मधे. करा बंगाल च्या घटनेचा विरोध. करा बांग्लादेशातील क्रौर्याचा निषेध. उतरा एकजुटीने रस्त्यावर. ते का नाही करत?


मुळात आक्रमण कर्ते तेव्हा ही येतच होते. आजही आहेत. अशावेळी शाळेपासून दुसऱ्या शी दोन हात करण्याचे प्रशिक्षण आपण देतो का? की फक्त गणपतीच्या मिरवणूकीत दांडपट्ट्याचे प्रात्यक्षिक पाहून टाळ्या वाजवल्या की संपली मर्दुमकी? एकाने एक कानाखाली वाजवली तर त्याच्या कानाखाली दोन देण्याची हिंमत आपल्या मुलांमधे आहे का? मुलींमधे आहे का?अहमद महमद च्या गिफ्टस ना न भुलता व नंतर 35 तुकड्यात पाठवणीची वेळ न आणता त्याला वेळीच दोन लगावण्याची हिंमत आपल्या मुलींमधे आहे का? मुळात एक मुलगा शाळेत जाताना माझ्या मागेमागे रोज येतोय हे वेळीच मुलींनी आपल्या आईवडिलांना, भावाबहिणींना सांगण्याची हिंमत व वातावरण किती घरात आहे?


अनेक प्रश्न आहेत. ज्यावर सोल्युशन हवे आहे. एकेकट्या मुस्लिम culprits च्या विरूद्ध  नावानिशी रान उठवायला हवे, जनमत गोळाकरून रस्त्यावर उतरायला हवे. त्याऐवजी "अख्खा मुस्लिम समाज" असे मोघम वार केले तर तो कोणावरच बसणार नाही.  When everybody thinks somebody should do it then nobody does it.


त्यामुळे टीम्सची फळी निर्माण व्हायला हवी. अकेले एक राष्ट्र पुरुष क्या करेंगे?


सैनिक लढताना फक्त त्याच्या कमांडर ची आज्ञा मानतो व तो त्याच्या बाॕसची.  प्रत्येक जण सैन्यप्रमुखाच्या आज्ञेची वाट पहात नाही की राष्ट्रपतींची. जरी त्यांची पदे सर्वोच्च असली तरी ती सामान्य सैनिकापर्यंत पोहोचवायला multiple layers ची, अनेक स्तरीय नेतृत्व रचना असायला हवी, जी सद्ध्या मुल्ला मौलवींकडे आहे पण आपल्याकडे नाही. Root cause analysis करून त्यावर काम करायला हवे. असे काही उपाय त्यांच्या लेखात असते तर ते अधिक परिणामकारक ठरले असते. 


माझे आपले 2 cents.


-सुवर्णा 12-Aug-2024

Saturday, March 16, 2024

नोस्टालजिया - समाजात हा बदल झालाय

 नाँस्टालजिया - समाजात हा बदल झालाय


“समाजात हा बदल कधी झाला”/ समाजात बदल का झाला/ काळ बदललाय / गेले ते सुंदर दिवस/ अमुक तमुक करणारी आमचीच शेवटची पिढी”  हे आणि असे काही लेख सोशल मिडियावर वेगवेगळ्या प्लॕटफाॕर्म वर बर्याचदा दिसतात व खूप दिवस फिरताना दिसतात. 


बदल झालाय हे खरंय. ह्यात चांगल्या आणि चांगल्या नसलेल्या अशा दोन्ही बाजू आहेत. 


मुलांनी स्वतः च्या पायावर उभे राहून त्यांना स्वतंत्र निर्णय घेण्याची क्षमता, स्वतंत्र  planning / आखणी करण्याची क्षमता व जबाबदाऱ्या पेलण्याची क्षमता त्यांच्यात यावी म्हणून तर आपण त्यांना लहानपणापासून तयार करत असतो. अगदी चिमणी सुद्धा आपल्या पिल्लांना त्यांच्या पंखात बळ येऊन त्यांना उडता यावे म्हणून प्रयत्न करत असते. एकदा पाखरे उडून गेली की पुन्हा बळजबरीने त्याच जुन्या घरट्यात त्याने राहावे अशी अपेक्षा पक्षी करत नाही. गरुडासारखे पक्षी तर कठोर मातृत्व दाखवतात. गरुडाची आई तान्ह्या पिल्लाला चोचीत धरून खूप उंचावर नेते आणि झटक्यात सोडून देते. ते बिचारे कोवळे पिल्लू भेलकांडत खाली खाली येते. अगदी जमिनीवर टेकण्या आधी पक्षिण परत त्याला चोचीत पकडते. असे काही वेळा केल्यावर खाली येता येता पिल्लू स्वतःचे पंख पसरते व फडकावून बघते. आणि एकदम वर झेपावले जाते. त्या उंचीची भितीच मनातून काढून टाकली जाते, तेव्हा त्याचा गरूड होतो.


माणसात आणि पक्षांमध्ये फरक आहे हे नक्की. मात्र हा फरक अधोरेखित करताना त्यांच्यातलं काय चांगलं आपण घेऊ शकतो आणि माणूस म्हणून काय गोष्टी आपण वेगळ्या करू शकतो याचा विचार करण्याची वेळ आली आहे.


 माझ्या वडिलांच्या ऑफिसमध्ये एक जण होते. त्यांचे वडील मुलाचा सगळा पगार काढून घ्यायचचे आणि नंतर तो सगळा पगार खर्च करायचे आणि त्या व्यतिरिक्त ही अनेक ठिकाणी काय काय खरेदी करून भरपूर उधारी करून ठेवायचे. अतिशय उच्च पदस्त असलेले हे गृहस्थ,   वडिलांच्या या सवयीमुळे आणि नंतर दर चार दिवसांनी घरात पुढे उभे राहणाऱ्या घेणेकरांमुळे त्रस्त झालेले होते.


साध्या साध्या, अगदी  पिक्चर ला जाण्याच्या,  मनासारखा एखादा नवीन ड्रेस घेण्याच्या, एखादी छोटीशी घरातली किंवा स्वयंपाक घरातली उपयोगाची वस्तू घेण्याच्या,  ते अशा कित्येक छोट्या छोट्या इच्छा आकांक्षांना एका पिढीने मन मारून दाबून ठेवले. त्यांच्या आधीच्या पिढीने हा मुलांवरचा आपला हक्कच आहे असे म्हणून त्यांना क्षुल्लक क्षुल्लक आनंदाच्या गोष्टी देखील नाकारल्या.


न्यूटनच्या तिसऱ्या नियमासारखी कुठलीही टोकाची कृती ही दुसऱ्या कुठल्यातरी कृतीची (इक्वल आणि अपोजिट) समान इच्छाशक्ती ने आणि विरुद्ध टोकाची कृती झाल्यामुळे त्याची प्रतीक्षिप्त क्रिया होते. त्यामुळे आत्ताच्या पिढीने आपल्या मुलांना त्यांचे निर्णय स्वतः घेऊ देणे, त्यांचे कपडे स्वतः निवडण्याचे स्वातंत्र्य देणे, हे मुद्दाम होऊन, ठरवून शिकवले. मात्र हे करताना काही जणांनी ते डोळसपणे शिकवले. कुठले कपडे घातलेले समाजात योग्य दिसणार नाहीत, कुठल्या प्रसंगात योग्य दिसणार नाहीत, कुठल्या व्यक्तींच्या समोर योग्य दिसणार नाहीत, कुठल्या वयात योग्य दिसणार नाहीत, कुठल्या व्यक्तीला योग्य दिसणार नाही आणि कुठल्या देश राज्यात योग्य दिसणार नाही आणि कधी काय घालावे असा सारासार विचार करून कपडे निवडायला हवेत हे जेव्हा मुलांना शिकवले जाते, कळते तेव्हा त्यांची निवड बऱ्यापैकी योग्य दिशेने वळते. पाश्चात्त्य देशांप्रमाणे आता आपल्या कडे देखील सर्रास अर्धी चड्डी घालून मुली रस्त्याने हिंडताना दिसतात. रात्री अपरात्री येताना दिसतात. मात्र त्यांच्या आजूबाजूचा समाज तेवढा प्रगत नसेल, तर या मुलींना काही प्रसंगी अपप्रवृत्तींचा त्रासही ओढवावा लागतो. एखादा खेळ खेळताना त्या खेळाला अनुरूप पोशाख असणे हे अगदी योग्य आहे. उद्या सानिया मिर्झाने किंवा पी.व्ही. सिंधू ने साडी नेसून खेळावे अशी आपण अपेक्षा करणे चूक आहे. मात्र ती खेळाच्या मैदानावर जो ड्रेस घालते तो घालून ती लग्नाला किंवा बाजारात जात नाही. एवढेच कशाला खेळ संपल्यावर बक्षीस समारंभाच्या वेळी देखील बहुतांश स्त्री व पुरूष खेळाडू देखील आपापला अंगभर पूर्ण पोशाख घालून बक्षीस घेण्यासाठी उभे राहतात. हे भान ज्या दिवशी येते त्या दिवशी ते कुणालाच खटकत नाही.


पूर्वीच्या काळी समुद्र स्नानाला जाताना देखील बायका नऊवारी पाचवारी साडी घालून जात असत. अजूनही जातात. मात्र ती नीट घट्ट बांधली नसेल तर पाण्याच्या लाटे बरोबर ती साडी आवरता आवरता नाकी नऊ येई. क्वचित साडी सुटे देखील. मग अशा प्रसंगी पाण्यात घालता येतील असे सुटसुटीत आणि अंगावरून सुटून निघून येणार नाही असे कपडे घालणं हे योग्यच आहे. तिथे पण आपण जर सावरता येत नसलेल्या मुलींना पाचवारी साडी, नऊवारी साडी, डोक्यावर पदर असा आग्रह करू लागलो तर ती अतिशयोक्ती होईल.


मुलांच्या आवडीनिवडी आणि सवयी यात आई-वडिलांच्याही आवडीनिवडी, सवयी, व्यसन यांचा खूप मोठा हात असतो. आई-वडीलच येता जाता मोबाईल वर खेळत असतात, स्विगीवरून जेव्हा पदार्थ ऑर्डर करतात किंवा आपल्याला मोबाईल वरून जमत नाही तर मुलांना “अरे, तू करून देतोस का रे?” असे सांगतात, त्यावेळी आपल्याला हवे तेव्हा स्विगी वरून ऑर्डर करण्यात काही चूक नाही हे मुलांना समजून चुकते. मग त्यांनी जर येता जाता बाहेरून पदार्थ मागवले तर दोष कुणाचा?


मला आठवतं आमच्या लहानपणी काही काकू माम्या नोकरी करायच्या. पण काही वेळेला त्या खूप थकलेल्या असल्या तरी घरच्यांची अपेक्षा असायची की थोडक्यात न भागवता, दोन भाज्या, पोळी, कोशिंबीर, भात असा सगळा साग्रसंगीत स्वयंपाक त्यांनी घरी करावा. आमच्या आधीच्या पिढीतील आया इडली, डोसे, पावभाजी, पिझ्झा असे पदार्थ घरी बनवू लागल्या होत्याच की. मात्र त्या वेळचे त्यांचे नवरे मात्र त्यांना त्यांच्या आईने कधी असले पदार्थ खाऊन झोपण्याची सवय न लावल्याने बाहेर किंवा घरी दोसा खाल्ला तरी घरी आल्यानंतर “पोळी भाजी कर” म्हणून आग्रह धरायचे. त्यामुळे घरची बाई अगदी मेटाकुटीला येत असे.


आता त्याच आयांनी आपल्या मुलांना रात्रीच्या वेळी नुसतीच पावभाजी आहे बरं, किंवा नुसतीच मुगाच्या डाळीची खिचडी आणि कोशिंबीर आहे आणि हे जेवण असू शकते हे पटवून दिले. सवय लावली. आपल्याला जो त्रास झाला तो आपल्या मुलांना आणि त्यांच्या येणाऱ्या सुनांना होऊ नये, हा त्यातील हेतू. मग आता मुलांचा आहार चौरस राहत नाही, असे म्हणणे चूक आहे. कुठल्याही प्रांतातील पदार्थ खाल्ले तरी ते पोटभरीचे असावेत. त्यातून प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स , चोथा, साखर, मीठ, तेल, फळे आणि भाज्या यांचे योग्य प्रमाणात रोज सगळे नाही तरी आठवड्याभराच्या काळात, रुटीनमध्ये शरीरामध्ये अंतर्ग्रहण ( इंटेक्/intake) व्हायला हवा हे पाहिले तरी खूप झाले. हे मुलांना समजायला हवे.


खूप जणांच्या कडे लग्नकार्याला जाताना, नातेवाईकांकडे जाताना, मुलांना घरी सासू-सासऱ्यांकडे, किंवा त्यांच्या मित्रमंडळींकडे, किंवा मोबाईल वा टीव्ही लावून घरच्या घरीच ठेवून जाण्याची एका पिढीने सवय लावली. त्यात “आपल्याबरोबर लटांबर नको” आणि “मुलांचे आवरणे, त्यांच्या वेळा सांभाळणे नको” हाही सोयीस्कर हेतू असायचा. शिवाय मोठ्यांच्या काही गप्पा मुलांनी ऐकू नयेत, असे काही वेळेला त्यांच्या मनात येत असे. “लग्नकार्यात मुले काय करतील? कदाचित बोर होतील” असाही विचार असेल. काही वेळेला अगदी छोट्या मुलांच्या ही शाळेच्या अभ्यासाचे उगाच अवडंबर माजवून ही मुलांना लग्नकार्यात किंवा नातेवाईकांकडे नेणे, किंवा एखाद्या शुभ अशुभ प्रसंगात नेणे टाळले जाई. आमच्या लहानपणी शाळेत चिठ्ठी देऊन अशा प्रसंगी रजा घेणं आणि रजेच्या काळातील मुलांचा अभ्यास भरून घेण्याची हमी घेणे हे खूप सर्वसामान्य होते. मात्र आता काही शाळा मुलांनी सुट्टी घेण्याबद्दल फारच जाचक नियम देखील लावताना दिसतात. त्यांचे होमवर्क अवाढव्य असतात. आणि उगाच लग्नकार्य, शुभ अशुभ प्रसंगी मुलांनी शाळा बुडवूच नये, अशा आग्रहाच्या झालेल्या दिसतात. अगदी लहान वा मध्यम इयत्तांमधे शाळांमधील हा बदल खरंच स्वागतार्ह आहे का? हे एकदा तपासून पाहिले पाहिजे. कारण अशातून शाळा मुलांना त्यांच्या सामाजिक गरजांपासून वंचित करत आहेत. त्यांच्या आपसूक होणाऱ्या  सामाजिक शिक्षणापासून, समाजात मिसळण्याच्या, नैसर्गिकपणे होणाऱ्या योग्य-अयोग्य वागण्याच्या, वावरण्याच्या, कपडे घालण्याच्या, बोलण्याच्या, मोठ्यांचा मान राखण्याच्या, वेळप्रसंगी कुठले विधी करण्याच्या, किंवा  काय करुनये  याच्या, अशा सगळ्याच आपोआप होणाऱ्या शिक्षणापासून मुलांना वंचित ठेवत आहेत. त्यांना इतरांशी मिसळण्याची संधीच देत नाहीत. क्वचित प्रसंगी एखाद्या ठिकाणी तुम्हाला बोर देखील व्हायला हवं तरच त्या कंटाळ्याच्या क्षणी काय केलं तर आपण आपले मन योग्यरितीने चांगल्या पर्यायाने रिझवू शकतो हे मुलांना कळेल. नाहीतर पुढे मोठे झाल्यावर हीच सोशल स्किल्स पैसे देऊन मानसोपचार तज्ञांकडून शिकवावी लागतील.


 घरातील लहान मोठी खरेदी करताना जेव्हा आपण घरातल्या प्रत्येकाला दाखवतो, त्यांच्या आवडीनिवडी विचारात घेतो, घरात येणारी नवीन मोठी वस्तू जसे सोफा, फ्रिज, टीव्ही या गोष्टी रोज येत नाहीत. त्यामुळे त्या घेताना घरातल्या सर्वांच्या आवडीचा, चॉईस चा आणि बजेटचा या सर्वांचा विचार करून आपण घेऊया, हे त्यांच्या मनावर बिंबवले जाते. तेव्हा मुले देखील अशा वस्तू खरेदी करताना तुम्हाला दाखवतील. 


मात्र मुलांना कधी तरी काही वस्तू त्यांना त्यांच्या स्वतःच्या जबाबदारीवर घेऊ दिल्या, तर त्यांना “दुसऱ्या कोणाचा सल्ला न घेताच मी हे आता कसं घेऊ” असा आत्मविश्वासाचा अभाव जाणवणार नाही. याचीही जबाबदारी पालकांनी घ्यायला हवी, कारण उद्या हीच मुलं मोठी होऊन एखाद्या मोठ्या कंपनीतला परचेस ऑफिसर बनतील, कंपनीसाठी लाखोंच्या खरेद्या करतील किंवा एखाद्या जागा विकत घेतील, मोठ-मोठी कंपन्यांच्या उभारण्या करतील. अशा प्रत्येक वेळी जर ते कुणाच्या तरी सल्ल्यासाठी अडून बसले तर त्यांच्या आत्मविश्वासात कमी येईल. 


वीस पंचवीस वर्षांपूर्वी एक पिढीच्या पिढी परदेशात सर्रास जाऊ लागली. त्यांनी तिथे पाहिले की 60, 70, 80 वर्षाचे लोक सुद्धा आयुष्य जगणे सोडून देत नाहीत. योग्य आणि सकस आहार घेतात, आणि फक्त दुसऱ्यांसाठी जगण्यात आपलं मन मारत राहत नाहीत. स्वतःसाठी देखील जगायला हवं हे त्यांना त्यांच्या कडून कळले. स्वतःच्या आवडीसाठी कधी ट्रिप काढणं, एखादा हॉबी क्लास जॉईन करणं, आपलं स्वतःचं एक मित्र मंडळ तयार करणे हे त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये सामावून घेतलंय. कदाचित परदेशामध्ये / पाश्चात्त्य देशांमधे 16 व्या वर्षीच मुलाच्या नावाची डिश फोडली जाते, यातून “आज पासून तुझे तू कमवायचे आणि स्वतंत्र राहायचे, यात तुझे शिक्षण हे ही तुझे तूच करायचे आणि स्वतःच्या पायावर उभे राहायचे” हे मुलाला आणि मुलीलाही शिकवले जाते. मात्र हे करताना कधी कधी ही मुले घरट्याकडे परतत नाहीत आणि आई-वडील मात्र एक-एकटे किंवा दोघे-दोघे राहतात. अशावेळी नुसतेच झुरत बसून स्वतःच्या तब्येतीची आणि मनस्थितीची हेडसांड करणे, यापेक्षा त्यांनी स्वतःला कशामध्ये तरी गुंतवून घेणे गरजेचे आहे हे तिथल्या मनोवैज्ञानिकांनी जाणले. त्यांच्या सरकारांनी जाणले, आणि त्याप्रमाणे त्यांच्या समाज मनाला तयार केले. आज TV व  OTT मुळे तोच ट्रेंड भारतातही दिसत आहे. मुले मोठी होऊन शिक्षणानिमित्त, नोकरीनिमित्त घराबाहेर पडतात, आणि प्रत्येक घरात एक प्रौढ किंवा वृद्ध जोडपे किंवा कधी एक-एकटे राहिलेले पालक दिसतात. या सर्वांनी स्वतःच्या आवडीनिवडीसाठी सीनियर सिटीजन क्लब, लाफ्टर क्लासेस, योगा क्लासेस, क्लब, भिशी पार्ट्या असे स्वतःला गुंतवून ठेवायला सुरुवात केली आहे. यात वाईट काहीच नाही. कारण उडणाऱ्या पक्षाचे पाय बांधून ठेवणं ही दुष्टकृती आहे. मात्र ते करताना, त्यांना आकाशात उंच उडवताना, त्यांनी मागे राहिलेल्या त्यांच्या घरट्या तील वृद्ध पक्षांचनाही स्वतःचं एक निरोगी आयुष्य जगता यावं,  आणि त्यांचे आयुष्य असेपर्यंत त्यांचे उदरभरण त्यांचे त्यांना करता नाही आले तर आपण करायलाच हवं हे ही संस्कार कित्येक पक्षी ही देतात.  मग मुले करियर साठी परगावी गेली तर त्यात वाईट वाटून घेण्याचे काय कारण? IIT, IPS, UPSC, अशा अनेक स्पर्धा (काँपिटिटिव) परिक्षा देऊन बदली च्या नोकऱ्या करणारी, सैन्यात जाणारी, सरकारी /खाजगी नोकरी साठी बदली च्या ठिकाणी  राहणारी, परदेशात राहणारी  मुले आता महाराष्ट्रात ही जास्त प्रमाणात दिसू लागली आहेत.  


एक काळ असा होता की माणूस पोस्टात किंवा बँकेत चिकटला की रिटायर होऊनच बाहेर पडायचा. ब्रिटिशांनी त्यांच्या सोयीसाठी तयार केलेल्या या काही नोकरीच्या अपॉर्च्युनिटीज होत्या,  ज्या त्या काळच्या मध्यम वर्गाला पचनी पतय होत्या, परवडत होत्या. मात्र काळ बदलला आहे. आताच्या आमच्या पिढीत सॉफ्टवेअर मध्ये, आयटीमध्ये किंवा इतरही क्षेत्रात दर दोन-चार वर्षांनी लोक जॉब बदलतात. त्यांना नवीन अपॉर्च्युनिटीज मिळतात. हे आधीच्या पिढीला पचवणे थोडे जड जात होते. मात्र सध्या कंपन्यांची ही अशीच अपेक्षा असते की सगळ्याच लोकांनी दोन-चार वर्षानंतर कंपनीला चिकटूनच राहू नये. त्यांनी नवीन टेक्नॉलॉजी शिकावी आणि कंपनीच्या बाहेरही जाऊन नवीन जॉब शोधावेत. कारण जसजसे लोक जास्त अनुभवी होतील तसे त्यांचे पगार वाढतील, आणि इतक्या सगळ्या वरिष्ठ पदाच्या नोकऱ्या कुठल्याच कंपनीत असत नाहीत. कंपनीत त्याला पिरामिड स्ट्रक्चर म्हणतात. जिथे एंट्री लेवल ला म्हणजे सुरुवातीच्या एक दोन वर्षाच्या अनुभवाच्या नोकऱ्या ह्या खूप जास्त प्रमाणात असतात, तर सगळ्यात वरिष्ठ माणूस हा एकच असतो, आणि त्याच्या खाली त्याला रिपोर्ट  करणारे आठ ते दहा लोक हे सीनियर मॅनेजर्स आणि त्यांच्या हाताखाली प्रत्येकी दहा ते पंधरा लोक असे हे पिरामिड असते. मात्र जर  लोक कंपनी सोडूनच गेले नाहीत तर एवढ्या सगळ्या लोकांना काम काय द्यायचे हा कंपनीला प्रश्न पडेल. आणि लोक तरी आहे त्याच पगारावर वर्षानुवर्ष, वीस वीस वर्ष तेच काम करत राहतील का? त्यांनाही प्रमोशनची अपेक्षा असेलच. त्यामुळे हा सगळा विचार करून बदलत्या काळानुसार प्रत्येकानी आपापल्या ज्ञानाच्या कक्षा रुंद करायला हव्यात आणि एका काळानंतर दुसरी कडे नोकरीच नाही तर स्वतःचीही नवीन कंपनी सुरू करण्याचा विचार करायला हवा, तरच हा देश नवनवीन उद्योगांनी, उत्साहाने भरलेल्या तरुणाईने आणि नवीन टेक्नॉलॉजीने विकसित होईल. यातील कित्येक नवीन टेक्नॉलॉजी या आमच्या पिढीनेही ऐकल्या नव्हत्या, तर आमच्या आधीच्या पिढीने तर ऐकल्या असण्याची शक्यता खूपच कमी आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, नॅनो टेक्नॉलॉजी, रोबोटिक्स, बायो इलेक्ट्रॉनिक्स अशा कित्येक नवनवीन शाखा उदयास येत आहेत. आमच्या आधीच्या पिढीने जे जॉब केले ते कदाचित याच्यापुढे अस्तित्वातही नसतील. पण याचा अर्थ जॉबच नसतील असे नाही, तर नोकऱ्यांचे स्वरूप, कामाचे स्वरूप आणि ज्ञानाचे स्वरूप बदललेले असेल. कंपन्यांनाही नवीन टेक्नॉलॉजी मध्ये शिक्षण झालेले लोक हवेच आहेत. त्यामुळे जर आताच्या मुलांनी आता पालकांना “मी अमुक एका कंपनीमध्ये नोकरी करू का?” असे विचारले तरी त्यावर आपल्या आधीच्या पिढ्यातले किती लोक त्यांना योग्य मार्गदर्शन करू शकतील? त्यामुळे हा निर्णय हा मुलांनी त्यांचा त्यांनीच घ्यायला हवा. त्यात काही चूक नाही हे आई-वडिलांनी देखील समजून घ्यायला हवे. मात्र “आपण नोकरी बदलली आहे, किंवा बदलणार आहे” हे आई-वडिलांशी चर्चा करून त्यांना सांगण्या इतका संवाद सगळ्याच पिढीने राखायला हवा.


 कंपन्यांमध्ये आजकाल “अजाईल मेथोडोलॉजी” असा एक नवीन कामाचा प्रकार आहे. यामध्ये प्रॉडक्ट किंवा वस्तू निर्माण करण्याचा कालावधी हा कमी केला जातो, आणि दर छोट्या छोट्या कालावधीत काहीतरी एक प्रॉडक्ट बाहेर पडत असते. (कधी कधी तर अगदी एक दिवसात, एक आठवड्यात किंवा एक महिन्यात प्राॕडक्ट तयार होते ज्याला पूर्वी सहा सहा महिने लागायचे.) त्यामुळे झटपट निर्णय घेणे, काही चुका झाल्या तरी त्या झटपट सुधारणा करता येणे शक्य होते. आणि हे करण्यासाठी “ अजाईल मेथोडोलॉजी” मध्ये एक “डेली स्टँड अप मीटिंग” असते ( रोजची छोटी बैठक/ किंवा  खरंतर न बसता केल्याने, बैठक न म्हणता उभ्या उभ्या होणारी दहा पंधरा मिनिटांची छोटी सभा म्हणूया) असते ज्यात प्रत्येक जण काल आपण दिवसभर काय केले? त्यात कुठे अडले? काय नवीन केले? आणि आज आपण काय करणार आहोत? याचा आढावा देतो.


अशीच एक स्टँड अप मीटिंग जर प्रत्येक घराने रोज घेतली किंवा निदान आठवड्यातून एकदा घेतली तर घरातल्या प्रत्येकालाच घरातला प्रत्येक माणूस काय करतोय, त्यांच्या आयुष्यात काय चालले आहे, त्यांच्या आयुष्यातल्या कुठल्या वळणावर त्यांना आपल्या सल्ल्याची गरज आहे का? पैशाची गरज आहे का? भावनिक आधाराची गरज आहे का? याचा एक थोडासा अंदाज येऊ शकेल. पक्षी सुद्धा जेव्हा घरट्यातून उडून जातात त्यानंतर त्यांच्यातील वृद्ध पक्षांची ही त्यांच्या तोंडात खाणे भरून घेऊन जाऊन काळजी घेताना दिसतात.


आता नोकरीसाठी घराबाहेर पडलेल्या मुलांनी किती काळ स्वतंत्र रहावे? आयुष्यभर स्वतंत्रच राहावे की काही काळानंतर परत एकदा आपल्या आईवडिलांबरोबर एकत्र कुटुंबात राहायला यावे हा सर्व त्या त्या कुटुंबाचा

कौटुंबिक विषय आहे.


असेच आपली मुले ही सुरुवातीला नोकरीनिमित्त, शिक्षणानिमित्त बाहेर जातील स्वतंत्र राहतील पण त्यानंतर आई-वडील वृद्ध झाल्यावर मात्र त्यांनी सर्वांनी पुन्हा एकदा एकत्र रहावे. किंवा रहावे का? राहिल्यास त्यांचे आपापसात पटेल का? मधल्या काळात ते सर्व किती काळ अधून मधून तरी एकत्र राहिले आहेत? एकमेकांच्या आवडीनिवडी समजून घेतल्या आहेत? खाण्यापिण्याच्या, राहण्याच्या, वागण्याच्या, बोलण्याच्या बदलेल्या सवयी समजून घेतल्या आहेत? आणि त्यांना एकमेकांचे राहणीमान किंवा वागणे हे पूर्णपणे अपरिचित तर झाले नाही ना? हे सगळे त्या त्या कुटुंबाच्या आपापसातील समीकरणावर अवलंबून आहे. 


आता करोना व लॉकडाऊन नंतर, वाईट टू के (Y2K) नंतर, इराण इराकच्या युद्धानंतर, रशिया युक्रेंनच्या युद्धानंतर, इसराईलच्या युद्धानंतर, सुनामीनंतर, अशा अनेक नैसर्गिक वा मानवनिर्मित संकटांनंतर परदेशी गेलेली कुटुंबे किंवा मुले परत येताना दिसतात. परत एकदा भारतात आल्यानंतर यातील अनेक कुटुंबे एकत्र देखील राहतात. सध्याच्या काळात खूप मोठ्या प्रमाणात मोठमोठया हाऊसिंग सोसायटी तयार होत आहेत. परदेशात जेवढ्या सोयी आहेत तशाच, किंबहुना कधी कधी जास्त सोयी देखील भारतीय सोसायट्यांमध्ये दिसू लागल्या आहेत. जिम, वॉकिंग ट्रॅक, स्विमिंग पूल, योगा रूम्स, मेडिटेशन रूम, गार्डन हे सर्व सोसायटीमधील अमेनिटी म्हणून दिले जाऊ लागले आहे. अशावेळी अनेक कुटुंबे एकाच सोसायटीमध्ये दोन-दोन तीन-तीन फ्लॅट घेताना दिसतात. आई वडील आणि मुलगा किंवा मुलगी समोरासमोरच्या फ्लॅटमध्ये किंवा एकाच सोसायटीतील फ्लॕट मध्ये राहतात. ते रोजच्या रोज भेटतातही आणि तरीही कित्येकदा रोजच्या रोज आपापले स्वतंत्र आयुष्य, प्रायव्हसी जगतात. एकमेकांच्या पायात पाय न घालता एकमेकांबरोबरचे सणावाराचे, संध्याकाळचे, वीक एंड चे असे कौटुंबिक व सार्वजनिक आयुष्य ही एकत्र जगतात. ही नवीन एकत्र कुटुंब पद्धती आहे. याचा सुद्धा बऱ्याच कुटुंबांनी स्वीकार केला आहे. जुन्या आठवणी, नॉनस्टॉल्जिया हा क्वचित कधीतरी चांगलाच असतो. पण जर जुनी पिढी दररोज किंवा दर थोड्या दिवसांनी “आमच्या वेळी हे असं होतं” आणि “आमच्या वेळी हे तसं होतं” असे म्हणत राहिली तर तरुण पिढी आणि अति तरुण नातवंडे हळूहळू तुम्हाला टाळू लागतील. आपले ज्ञान, आठवणी, शिकलेले शहाणपण किती मर्यादेपर्यंत पुढच्या पिढीला सांगायचे किंवा नाही सांगायचे हे ज्याचे त्याने ठरवायला हवे. तुम्ही दोन पावलं पुढे या आणि आम्ही दोन पावले पुढे टाकतो असे म्हटले तरच ही मोट बांधली जाणार आहे. आणि जनरेशन गॅप हा काही ह्याच पिढीचा शाप नाही. अगदी रामायण महाभारत काळापासून जनरेशन गॅप होतीच. रामायणाच्या काळात आई-वडिलांचे अतीच ऐकल्यामुळे रामाला 14 वर्षे वनवास भोगाव लागला तर महाभारताच्या काळात आई-वडिलांचं मुळीच न ऐकल्यामुळे आणि नितीनियम झुगारल्यामुळे कुळाचा नाश झाला. याचा सुवर्ण मध्य आपणच साधायचाय. आपल्यासमोर दोन्ही टोकाची उदाहरणे आहेत. अगदी अलीकडचे पुलंच्या “असा मी असामी “ मधील “असामी” ने देखील नवीन आणि जुन्या पिढीतील जनरेशन गॅप अधोरेखित केलीच आहे. ही जनरेशन गॅप आपण एन्जॉय करत आत्मसात केली तर आपणही सुखी होऊ आणि आपली मुले देखील सुखी होतील असे वाटते.


- सुवर्णा

16-मार्च-2024

Tuesday, March 12, 2024

नावात काय आहे?


मुंबई च्या 7 स्टेशन ची नावे बदलली. त्यावर एका मित्राची  काॕमेंट आली, "अरे अजून इतक्या वर्षांनंतरही मी CST ला VT च म्हणतो".


त्यावर लक्षात आले, CST चे तर जाऊच दे, अजूनही कित्येक लोक बाँम्बे, बँड्रा, वगैरे म्हणतात त्याला काय म्हणावे! ब्रिटिशांचा व हिंदी भाषिकांचा (नको इतका फाजील ) प्रभाव.


पण म्हणावेसे वाटले, की तुमची पुढची पिढी मात्र नवीन नावच उच्चारेल कारण त्यांनी तेच ऐकले आहे.


मी मुंबईत आल्यावर सांताक्रूज जवळ एका क्लास ला जात होते. ते नाव चांगलेच तोंडात ही बसले. नंतर जाॕब लागल्यावर कोणीतरी म्हटले, " मी सँटाक्रोज ला राहतो." ऐकताना एकदम विचित्र वाटले. कदाचित इंग्रजी शब्दाचा तो उच्चार योग्य असेल ही, पण स्टेशनचे नाव मात्र "सांताक्रूज" च पटत होते कारण तेच रोज वाचले होते.


"संभाजीनगर"ला अट्टाहासाने "औरंगाबाद" म्हणणारे, "प्रयागराज"ला अट्टाहासाने "अलाहाबाद" म्हणणारे लोक आहेतच.


"नगर" चे एक बरे आहे. त्याला खूप वर्षांपासून "अहमदनगर" असेही फारसे कुणी म्हणत नव्हते तर  आता "अहिल्यानगर" हे नाव ही कोणाच्या लक्षात राहिले नसेलच. त्याचे नाव आपले नुसते "नगर" च. काही शहरांची नावे मात्र सदा सर्वकाळापासून असलेली नसलेली सर्व नावे समजूतदार लोक समजून घेतात. तुम्ही "बडोदा/वदोडा/ वडोदा/ वडोदरा/बडोदरा" काही महटले तरी लोकांना कळते. तसे, "बनारस/वनारस/वाराणसी/वाराणशी/ काशी"   काही ही म्हटले तरी कालमानाच्या पलिकडे जाऊन लोक बापडे समजून घेतात. 


पण आपल्या नावाबद्दल जसा आपल्याला अभिमान असतो तसा गावांच्या नावाबद्दल ही असतोच की. पुण्याचे काॕस्मोपाॕलिटियन रूप झाल्या पासून तर गावांच्या नावाच्या नुसत्या चिछड्या उडाल्या आहेत. ते ऐकताना अगदी कानावर तप्त रस पडल्यासारखे वाटते.


"हिंजव डी" ला "हिंजे वाडी", "बाणेर" चा बाणेदार पणा जाऊन मुळमुळीत "बानेर", "येरव डा" चे "येर वाडा", औंध ( अऊँध असा उच्चार मराठीत आहे) पण त्याचे हिंदी भाषिकांनी केलेले "आॕन्ध", "सातारा" चे "सतारा", मुबलक विहीरींचे / बाव असलेले "बाव धन" चे  एकदम सावधान म्हटल्या सारखे "बावधान", एक ना दोन. शब्द उच्चारताना कुठे तोडावा ह्याचे एक स्थानिक गणित असते. आता "हडप सर" ला उच्चारताना "हड पसर" म्हटले तर चालेल का?


 पण नवीन नावे तोंडात बसायला अंमळ वेळ लागतोच. जर लग्न ठरण्याच्या आधीपासून होणारी सून घरी येतजात असेल, परिचयाची असेल तर, लग्न झाल्यावर तुम्ही कितीही नाव बिव बदला, बहुतांशी लोक जुन्याच नावाने हाक मारतात. आणि माहेरचे आणि सासरचे लोक तर हमखास आपापले ठेवलेले नाव घट्ट धरून बसतात.


कधीकधी असे खास कारण नसते पण जुने नाव तोंडात बसलेले असते म्हणून आपण म्हणत राहतो. आपण ही कलकत्ता म्हणतोच की. अजून कोलकाता किंवा बंगळुरु वगैरे तोंडात बसत नाही. 


मात्र "मद्रास" म्हणणे सुटले आहे. Thanks to "Chennai express" आणि Chennai super kings😀


शेक्सपियर म्हणतो नावात काय आहे? तर महाराजा, नावातच सर्व काही आहे.


त्या त्या नावाबद्दल आत्मीयता वाटल्या शिवाय माणसे आपणहून नाव उच्चारत नाहीत. नाहीतर चांगल्या रमेश, सुरेश, शुभांगी चे बंट्या, बाळ्या, पिंटी होते.


आमचे एकजण ओळखीचे होते. ते नावावरून भविष्य सांगायचे. ते नेहमी म्हणत, "नाव बदला म्हणजे माणसाचा, शहराचा, देशाचाही, स्वभाव, चेहरामोहरा बदलेल".


प्रत्येक जेत्याला शहरांची नावे बदलावीशी वाटतात कारण त्यानंतर त्याची जुनी ओळख पुसली जाणार असते. हे राजरोस पणे होते. ( हेर बीर लोकांसारखे लपून छपून नाव बदलावे लागत नाही.) त्यामुळे नव्या राज्यकर्त्यांचा जनमानसावर ठसा उमटवणे, नव्या सत्ते विषयी अभिमान व निष्ठा जागृत करणे सोपे जाते. एक नवा इतिहास त्या त्या शहराला, देशाला नवीन नावाने इतिहासाच्या पुस्तकात स्थान देणार असतो. कधी पारतंत्र्यांच्या खुणा पुसून टाकायच्या असतात व नवीन टीम, नवा अभिमान वाढवायचा असतो.


 इतकेच कशाला अगदी एखाद्या कंपनीत ली छोटी शी डिविजन/ युनीट एका मॕनेजर कडून दुसऱ्या मॕनेजर कडे गेले की खूपदा त्या डिव्हीजन चे नाव बदलले जाते. त्या युनीटचे भविष्य बदलण्याचा एक छोटासा प्रयोग च म्हणा ना.


तर असे हे नाव पुराण व नावांची महती.


-सुवर्णा

13-3-2024

Tuesday, August 23, 2022

 खाण्यासाठी जगावे की जगण्यासाठी खावे?


कोंबडी आधी की अंडे आधी तसा हा प्रश्न युगानुयुगे चालत आलेला आहे. मात्र कलियुगा इतके खाण्याचे विविध options इतर युगात असण्याची शक्यता थोडी कमी आहे. 


कोणी काही म्हणो खाण्यासाठी जगावे हेच खरे.


जगण्यासाठी खाणारी माणसे फार च गंभीर, खूपच विचार करत राहणारी व प्रत्येक गोष्टीतील enjoyment चा भाग पूर्णपणे त्यागून अलिप्त झालेले असतात. 


ते रसरसून आयुष्य उपभोगत नाहीत तर आलिया भोगासी असावे सादर म्हणून प्रत्येक गोष्ट गंभीर पणे घेऊन त्याचा कीस पाडतात. जे लोक फक्त  जगण्यासाठी खातात त्यांचे आयुष्य  कदाचित 25-30 वर्षे जास्त असेलही. पण त्यातील ते जगले किती? असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर खूपच कमी लोकांकडे खरच तेव्हढी 25 वर्षे जास्त असेल.


जगण्यासाठी खाणारी माणसे, पाऊस पडला म्हणून भिजायला जाणार नाहीत, की पाऊस बघत भजीचे रसभरीत चोचले पुरवणार नाहीत. चार नवीन पदार्थांचा सोस नाही की नवनवीन ठिकाण चे अनुभव, चव, मित्र गोळा करण्याची हौस असणार नाही. 


खेड्यात बायकांनी कुंकवाला आणि पुरुषांनी चहाला नाही म्हणू नये अशी म्हण दिसते. त्या हवेत व मेहनतीत ते पचत ही असेल. पण आलेल्या पाहुण्याचा पाहुणचार हा खाण्यापिण्यानेच होतो हे खरंय व अधोरेखित होते. चाय पे चर्चा आणि talks and bonding with coffee हे निखालस सत्य आहे.


रिकाम्यापोटी गप्पा देखील फार होत नाहीत. त्यामुळे जगण्यासाठी खाणार्या माणसांना मित्र ही मोजकेच असतात. ( अपवाद असतील ही). खळखळून हसणे आणि ढसढसा रडणे आणि मोकळे होणे अशा शुल्लक गोष्टीतही ते प्रथम सुखदुःखे समेकृत्वा असा विचार करतात, जो काहीच लोकांना झेपतो. बाकींचे अंगावर भावनांचे, विचारांचे ओझे घेत जगतात.


शारिरीक दृष्ट्या भरपूर आयुष्य  असले तरी मानसिक दृष्ट्या तो परित्याग नसेल तर अशी माणसे एकेकटी जास्त आढळतात. कारण बोलण्याचे त्यांचे सामान्य विषय च कटाप होतात. 


ज्याला चवीचे चोचले तो आपसुक त्यासाठी मेहनत पण करतोच. त्यामुळे चवीने खाणार त्याला देव देणार अशी वृत्ती अंगिकारावी हेच बरे. 


नाहीतर उद्या वर गेलो आणि चित्रगुप्ताने विचारले की रंकाळ्यावर भेळ खाल्लीस का? वैशाली रुपाली चे डोसे खाल्लेस का? अठरापगड चहा ची चव पाहिलीस का? अप्पाची खिचडी, झणझणीत मिसळ, गरमागरम चीझच्या सुटणार्या शेवयांसारख्या तारे चा पिझ्झा, सणाला केलेल्या साजुक तुपाची धार सोडून वाढलेल्या मऊसूत पुरणपोळ्या,   प्रवासात खाल्लेले बटाटेवडे, गुजरात चा खमण, राजस्थान ची दालबाटी, दक्षिण भारतातील समस्त उडदाची डाळ व तांदळाचे विविध पदार्थ,  खोकल्याच्या नावाखाली मटकावलेला आलेपाक, काँटिनेंटल, चायनीज, एशियन, एक ना दोन... तर सांगायचा मुद्दा, हे सगळं  खाल्लंस की नाही?


आणि "नाही" म्हटलं तर चित्रगुप्त महाराजांनी दिलं ढकलून परत आणि " जा जरा आयुष्य जगून ये" म्हटले तर काय घ्या.


त्यापेक्षा आत्ताच काय ते खाऊन घ्या. "इंद्रस्य (शक्रस्य) तक्रं दुर्लभः" असे म्हणतात. अहो! जिथे साक्षात स्वर्गाच्या राजाला देखील स्वर्गात ताक सुद्धा मिळत नाही असे म्हणतात तर बटाटेवडा कुठून मिळणार? त्यामुळे इथे आहोत तोपर्यत खाऊन घ्यावे हे बरे. कसे??? हा हा हा हा.



- सुवर्णा उपलप

23 Aug 2022

Saturday, March 26, 2022

Democracy and right of opinion

Today someone forwarded an old video of Atalji's speach during Sharad Pawar's 61st birthday.

Very true opinion. Gone are those days when political leaders used to meet for tea, lunch and dinner. They used to debate on totally opposite views. Atalji very rightly said, " loktantra me matbhed ho sakte hai, koi mitra hota hai, koi mitra nahi hota hai. Lekin shatru koi nahi hona chahiye".(sic) This whole philosophy is now going down the drain. If someone praises Sharad Pawar then those become shatru for someone and mitra for someone. If someone praises Modi, then immediately some mitra become shatru and some not mitra become mitra.


 Democracy has the base of difference of opinions. When one can express a different view freely, then that is the freedom of expression. One can argue about correctness or wrongness of the opinion, debate about it freely. However, when we say you should not speak a word about xyz or you should say only positive or only negative about xyz, it is communism or dictatorship, it is not loktantra, democracy. Democracy brings maturity. Democracy brings patience to hear totally "opposite" opinions and totally "for" opinions which both may not be correct, and democracy gives maturity to debate point by point, about each subpoint and its accuracy. 


Atalji very rightly said that, "the days are coming where everyone is becoming extremist, they either become shatru or mitra There is no patience. Every opinion has to finally have base of priority of Nation ."(Sic) 


Now political parties boycott tea, lunch, dinner arranged by  CM or any opposition party and same is followed by common people. 


Sharad Pawar has friends in every party with whom he eats, talks, debates. May it is Gadkari or Thakre, late Munde, late Pramodji Mahajan or Sonia. But he has his own opinion, agenda, and thought process of running his party and nation. He fights with all  of them on ballet poll not personally.


We are all Indians first and for a better democracy we need to respect each and every opinion. We can try to convince or get convinced. Or sometimes we can be somewhere in between. However, the open discussion should happen in the society. 


Why extremists and terrorists are born? They are not like that from their birth. They become so, over the period because someone or they themselves hammer them with same thought again and again and again. They are taught not to listen to any other view. They are taught that listening or accepting any other view is a sin. As Quran says, "If you listen any thing against Allah or against any view mentioned in Quran, then it is sin and you have right to punish those". This is a thought process to create extrimists by nature. 


The right way to bring back an extrimist from the extreme view, is to listen their views and debate. Give other perspectives to them. Teach them slowly to respect every view, and it is ok to agree to disagree.  This is the right way of democracy. 


Hindusthan or India or Bharat has democracy in its nature. Charcha and samiksha are basic characteristics of Sanatan Dharma. So religion, or caste, or profession or opinion or "ism" are all part of opinion database. What is religion? It is only difference of opinion about some or many principles. 


Jews or christians or muslims are actually same as they follow bible. The only difference christian have from jews is they worship idol, they believe in trinity and they changed some rules about eating habits among few others. The difference between Muslims and christians is again they went back to "no idol worship", again back to some rules of eating habits partially, adding some extreme rules about law, among few others. What hindu dharma says is "everyone has a choice to worship based or their liking, sagun, nirgun, idol, no idol, any day- sunday, monday, tuesday ,.. saturday, post eating , without eating or eating with restrictions, no violence or violence for only self protection." 


We can hear out each other, talk about your own opinion freely, accept or disagree other opinions. The day we say "no more expression of your view", we are already an extrimist or on the path of becoming so. 


-Suwarna

27 Mar2022

Friday, March 18, 2022

एक दिवस आठवड्याचा

एक दिवस आठवड्याचा!!! 

देऊन तर बघा....

इतके तर आपण करूच शकतो. प्रत्येकाच्या सोयीनुसार, सगुण करा की निर्गुण, करा. साकार( कुठल्याही मूर्ती , प्रतीके, प्रतिमा स्वरुपात) करा की निराकार ( प्रकाश,अवकाश, मन स्वरुपात) करा. षोडषोपचारे ( आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान/अभिषेक, वस्त्र, यद्न्योपवित / मंगळसूत्र, अनुलेपन/ गंध - अक्षता, फुले, धूप, दीप/ आरती, नैवेद्य, नमस्कार, प्रदक्षिणा / परिक्रमा, विसर्जन.) करा किंवा  मनापासून हात जोडून नमस्कार  करा. आरती म्हणा किंवा ध्यान (meditation) करा. खाऊन पिऊन करा किंवा फराळ करा किंवा  अगदी निर्जळी उपास करून करा. पूर्णपणे श्रद्धा म्हणून करा किंवा शास्त्र शुद्ध माहिती जाणून घेऊन करा. पोथी वाचून करा, कथा ऐकून करा किंवा इंटरनेटवरून समजून घेऊन करा.


इतके आॕपशन इतके पर्याय, इतके मुक्त हस्ते दिलेले स्वातंत्र्य तर कुठल्याही इतर ठिकाणी नाही. सतत वाहता, उत्क्रमित होणारा हा सनातन (/ पुरातन काळापासून चालत आलेला ) धर्म आहे.


बर्याचदा आपण ऐकतो, अमुक तमुक लोक शनिवारी त्यांच्या  प्रार्थनास्थळी जातात. तमुकतमुक शुक्रवारी जातात. तमुक अमुक रविवारी जातात. आपण मात्र कधीही देवळात जात नाही. फारतर सणावाराला, किंवा  सठी-सहामाशी वाढदिवस किंवा परीक्षेच्या आधी गुपचूप देवळात जाऊन येतो. त्यामुळेच आपण विखुरलेले आहोत.


हे किती छोटे कारण आहे विखुरण्याचे...असेच जर असेल तर चला देऊन बघुया...एक दिवस आठवड्याचा. जिथे असाल तिथल्या देवळात जा, जो पटेल त्या उपचाराने मनापासून नमस्कार तर करून पाहू. वाईट तर नक्कीच काही होणार नाही.


Meditation चे महत्त्व आता शास्त्राने/सायन्सने पण मान्य केले आहे.  आस्तिक माणसांना बरेच शारिरीक व मानसिक आजार होण्याचे प्रमाण कमी असते असे काही चाचण्यांमधून सिद्ध झाले आहे.  आपण लहानपणा पासून पिक्चर मध्ये ऐकत आलेलो आहोत, " अब इसे दवा की नही दुवा की जरूरत है!" यातला गंमतीचा भाग सोडला तरी हा मुद्दा अधोरेखित होतोच.


आता काही लोक युक्तीवाद करतात, नुसता देवधर्म करण्यापेक्षा काही समाज कार्य करा. उत्तम विचार आहे. सवंगडी जमवून ठराविक वारी देवळाचा परिसर स्वच्छ करा. एकही भिकारी देवळाच्या परिसरात दिसणार नाही याची व्यवस्था करण्यासाठी भिकार्यांना करता येण्याजोगे सन्माननीय काम द्या जसे एखादी वस्तू विकणे. उदाहरणार्थ अगदी पेन, पेन्सिल, फुले, किंवा इतर साहित्य वगैरे व सुरुवातीचे भांडवल तुम्ही घाला. फार लागत नाही. शंभर रुपयात पण बरीच फुले येऊ शकतील जे विकून त्या गरीबाला भीक मागण्या पेक्षा  मानाची कमाई मिळवण्याचा मार्ग सापडेल. कुठे छोट्या मुलांना शिकवा. तुमचाच इतिहास , पुराणे वगैरे उजळणी करून नवीन पिढी कडे जाईल. हाती वेळ व उत्साह असेल तर प्रवचने, कीर्तने, व्याख्याने भरवा. अगदी लहान मुलांमध्ये देखील ह्या माध्यमातून एकाग्रता, वक्तृत्व इ. गुण विकसित व्हायला मदत होईल.


बरेचसे धर्म हे एक परिपूर्ण  संस्था रुपी काम करतात. जिथे ह्या ना त्या रुपात लोकसंग्रह, लोकविकास, व त्यातून सामाजिक विकास होत असतो. 


हे सगळे आपण  खूप पूर्वी पासून करत होतोच. आता त्यावर धूळ जमली आहे इतकेच. आपल्याला आपल्या सोईचा वार सुद्धा निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. सोई नुसार गर्दी चे वा बिनगर्दीचे देऊळ निवडण्याचे पण स्वातंत्र्य आहे. त्यामुळे कोणासाठी नाही, तर स्वतः साठीतरी, दहा मिनिटे असू दे वा दोन तास असू देत, आठवड्यातून एक दिवस कुठल्या ही एका देवळा साठी देऊन तर पहा!!!


सुवर्णा उपलप

17-Jan-2020



पुणे आणि ट्रॕफिक

कधी बदलणार?


कधी बदलणार RTO चे रुलबुक? Right of the way, ही संकल्पनाच रुलबुक मध्ये नाही. कसे काय आपण अपेक्षा ठेवू शकतो की सिग्नलला लोक पहिल्यांदा आलेल्याला वाट देतील?


हॉर्न वाजवून गाडी घेतल्याचा आनंदोत्सव साजरा करणाऱ्या लोकांचा हा देश आहे. इथे ट्रकच्या मागे आवर्जून लिहले जाते "हॉर्न, OK, please". आवाजाने प्रदुषण होते ही जाणीव इथे कोसो दूर आहे. इथले ड्रायव्हिंग स्कूलचे इंस्ट्रकटरच गाडी चालवताना सतत हॉर्न वाजवत गाडी कशी चालवावी ह्याचे शास्त्र शुद्ध प्रशिक्षण देतात. वर "हॉर्न न वाजवता समोरचा हलेलच कसा? "ह्यावर त्यांचा ठाम विश्वास असतो. सांगितले तर आपल्याला च वेड्यात काढतात. किती ड्रायव्हिंग स्कूलला आज पर्यंत त्याचे विद्यार्थी गाडी नीट चालवून दाखवू शकले नाहीत म्हणून दंड झाला आहे? त्यांना कधी जबाबदार ठरवणार? (Accountability @ground level ) मूळ दायित्व ड्रायव्हिंग शिक्षण व्यवस्थेलाला च एकदा देऊन बघा.  त्यांना   खोर्याने पैसा मिळतो. मग जबाबदारी पण नको? ते ती जबाबदारी चुकार विद्यार्थ्यांना आतल्या मार्गाने ढकलत ढकलत लायसंस देऊन पूर्ण करतात. 


सद्ध्या वाहन चालकाला शिक्षणाची अट असावी का? ह्यावर प्रचंड चर्चा होत आहे. कारण काय? तर शिकलेले लोकच जास्त अपघात करतात. चुकीचे ओव्हरटेक करणे, उगाच हॉर्न वाजवणे, वाहनांची लांब रांग लागलेली दिसली की आपण कसे हुषारीने निसटू शकतो, असा आगाऊ विचार करुन उलट बाजूने गाडी घुसवून समोरासमोर तासन् तास गाड्या अडकवून ठेवणे व सर्वांना च खोळंबा करणे असे कसब ते दाखवतात. "सायकल व स्कुटर ला वाहतूक नियम पाळण्याची गरज नसते. उलट गर्दी मद्धे premium Rush च्या नायका सारखे कसब दाखवण्या साठीच हे वाहन सुशिक्षित चालकांना दिलेले आहे", अशी यांची ठाम समजूत असते. एका कुशल संगणक अभियंत्याने तर मला आश्चर्याने विचारले " जर दुचाकी घेऊन पण मी लेनबीन पाळायची असेल तर दुचाकीचा काय उपयोग? लवकर (कसेही..हे silent) पोहोचायचे असते म्हणून तर आम्ही दुचाकी घेतो." इथे उच्च शिक्षितांची ही अवस्था तर बाकीच्यांचे काय?


"अहो पुण्यात ट्ँफिक रुल वगैरे असे काही नसते. (भ्रम आहेत हे.. हे मनात)" असे तर शेंबड्या पोरापासून ते सुरकुतलेल्या आजोबां पर्यंत कोणीही ठणकावून ऐकवत असतो. 


हेल्मेट..हा तर काश्मीर इतकाच जुना प्रश्न आहे. आणि जशी काश्मीर प्रश्नावर  अनेक दुकाने वर्षानुवर्षे चालू आहेत तशी पुणे आणि हेल्मेटवर आहेत. (पूर्वी मेट्रोचा ही नंबर आधेमधे पुढे यायचा पण आता तो जरा मागे पडला आहे.) तर  हेल्मेट सक्ती आधी की बाकीचे ट्र्ँफिकचे नियम आधी हा स्वातंत्र्य आधी की सुराज्य आधी इतकाच गहन मुद्दा आहे. 


त्यामुळे ट्र्ँफिकरुल बुक एकदा नव्याने लिहायला घ्याच, अशी माझी समस्त धुरीणांना नम्र विनंती आहे.


- सुवर्णा उपलप.

1-Jul-2019

Yellowstone यलो स्टोन एक आठवण

 अमेरिकेतील जंगलांमध्ये हिंडताना प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे जंगल संवर्धन करताना तेथील नैसर्गिक अधिवास जपण्याचे विविध एनजीओंमुळे आणि सरकारी शिस्तीने सुरु असलेले प्रयत्न.


जंगलात जाण्यापूर्वी नोंद करावी लागते . प्राणी आणि माणसे दोन्हींच्या सुरक्षे साठी पुरेपूर काळजी घेतली जाते. प्राण्यांच्या वावराच्या, येण्या जाण्याच्या वेळा दिलेल्या असतात. त्यांना खायला घालू नये. जवळ जावू नये अशा वेगवेगळ्या सूचनांचे पत्रक तिकीट काढल्यावरच लगेच  हाती पडते.


तुम्हाला जंगलात मुक्काम करायचा असल्यास स्वतंत्र संरक्षित ठिकाणी काही मूलभूत सोई दिलेल्या असतात. जिथे सुरक्षा रक्षक जवळ च्या अंतरावर असतात. मात्र दिवसा  जंगलात हिंडताना जो इतर कुठल्याही जंगलात असतो तो धोका  आपण पत्करुनच जावे लागते. 


मात्र तेथे आढळणारे प्राणी पक्षी यांची माहिती बरोबर माहितीपत्रकात असल्याने जेव्हा कुठलाच प्राणी दिसत नसतो तेव्हा वाचायला सोय होते.  अमेरीकेचा 36% भूभाग हा जंगलांनी व्यापला आहे, म्हणजे सुमारे ३३.१३ लक्ष चौरस किमी. जगभरात झाली तशी अमेरीकेत ही खूप जंगलतोड झाली. २00५ साली जुन्या वाढलेल्या  प्राचीन  जंगलांचा नाश झालेल्या प्रमुख देशांत अमेरीकेचा सातवा क्रमांक लागला होता.  मात्र स्थलांतरीत लोकांचे ओघ जसे वाढत गेले तसे मानवी अधिवासासाठी जंगलतोड जगभरात आणि त्यातल्या त्यात उद्योग, शिक्षण व नोकरी या संधी उपलब्ध असलेल्या देशाः मधे मोठ्या प्रमाणात झाली.


तिथे टोंगास, चुगाच,हुम्बोल्ट. गिफर्ड पिंछो . यलो स्टोन अशी अनेक राष्ट्रीय जंगले  आहेत. जंगलात जिथून लांबून प्राणी, पक्षी, विविध झाडे, त्यांचे  फुलण्याचे बहर, कालपरत्वे दिसू शकतील हे विचारात घेऊन रस्ते बांधलेले आहेत. त्यामुळे एक दोन कुटुंबे  किंवा 6-7 जणांचा गृप असे  जंगल सफारीला जाऊ शकतात. या जंगलांमध्ये गेले तर मैलोंमैल रस्ते सुरस आणि चमत्कारिक गोष्टीचा खजिना जागोजाग दाखवतात.


आम्हाला यलोस्टोनच्या नँशनल पार्कमध्ये १०-११ दिवस राहण्याचा योग आला होता. व्योमिंग. इडाहो आणि माँटाना ह्या ३ राज्यात मिळून  3.5 चौरस मैल पसरलेल्या ह्या जंगलाचे पाहण्यासाठी प्रामुख्याने पाच भाग पडतात.


गरम  पाण्याचे झरे व फवारे. ( geysers and hot springs),जंगली प्राणी आणि पक्षी, झाडोरा आणि प्रत्येक ऋतुतील भिन्न रंग संगती, ग्रॕँड कँनियन चा प्रदेश व ट्रेकिंग/ गिर्यारोहणाचे प्रदेश.


प्रामुख्याने ओल्ड व्हिलेज, ग्रँट व्हिलेज, मँमथ व्हिलेज. लेक व्हिलेज आणि कँनियन व्हिलेज असे भौगोलिक भाग आहेत. प्रत्येक भागात वेगळे प्राणी व वेगळे भू प्रकार दिसतात. 


यलोस्टोनची ग्रँड कँनियन ही अमेरीकेतील चौथ्या क्रमांकाची मोठी दरी आहे. जिथे यलोस्टोन चा दोन पैकी पहिला धबधबा आहे. जो उंची ने सर्वात उंच असलेल्या पहिल्या काही धबधब्यामध्ये गणला जातो. त्या धबधब्याच्या वरच्या भागातून खाली पाहताना आपण निसर्गाच्या अफाट निर्मिती मधले किती क्षुल्लक प्राणी आहोत ह्याची जाणीव आत खोल पर्यत होते. निःशब्द अनुभूती घेणे एवढेच काय ते हाती उरते, आणि वरून खाली वाकून पाहणे हा तितकाच भयावह अनुभव की त्या उंचीने भोवळ यावी.


अमेरिकन ग्रीझली बिअर - काळी अस्वले हे यलो स्टोन चे वैशिष्ट्य . करडे पांढरे असे बर्फात लपून जाणारे नाँर्थवेस्टर्न लांडगे, जर लक्ष नसेल तर क्षणार्धात इथून तिथे जाऊन लुप्त होणारे.  रानगवे आणि अमेरिकन रानगवे, आणि हरणे तर पुढेपुढे इतके  दिसू लागतात कि चारपाच दिवसांनंतर आपण हे रानगवे पहात च मोठे झालो आहोत असे वाटू लागते. ते अजस्त्र आणि बर्यापैकी निर्बुद्ध दिसणारे धूड किंवा धुडांचे लोंढेच्यालोंढे विधात्याने,काय विचार करून जन्माला घातले असावेत असा क्षणोक्षणी प्रश्न पडतो. मूस, एल्क, आँटर, कोल्हे हे मात्र क्वचित दर्शन देऊन मानवाच्या चाहुलीने घाबरून लपत पळणारे प्राणी. ह्याच बरोबर पिनटेल, गडवाँल, मँगपाय, कँनडा गूस आणि अगणित प्रकारचे पक्षी डोळ्यांचे पारणे फेडतात. 


पण ह्या सर्वांपेक्षा यलोस्टोन चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे  गिझर्स. गरम पाण्याचे अगणित झरे आणि फवारे. यलोस्टोन जंगला च्या परिसरात पृथ्वीचा जमिनीचा थर  कित्येक ठिकाणी  इतका पातळ झाला आहे कि कधी अचानक तुम्ही उभ्या असलेल्या जमिनीखालून जमीन दुभंगून भूगर्भातील गरम पाणी किंवा लाव्हारस उसळून बाहेर पडेल आणि आजूबाजूच्या प्राणी वनस्पतींचा क्षणात जळून कोळसा होईल हे कोणी च सांगू शकत नाही.  पण निसर्गाचा नैसर्गिकपणा तो हाच. त्याला तितक्याच श्रद्धेने आधीन होऊन सामोरे गेलो तरच हे असे अनघड रोमांच अनुभवास येणार.


ओल्ड फेथफुल हा धबधबा 1870 सालापासून दर 90 मिनिटांनी वर उसळतो. वर्षानुवर्षे हे अव्याहत चालू आहे. 106 मी पासून सुरू होत साधारण 185 मी पर्यत उंच जात राहतो. त्या विधात्याला स्पर्श करू पहात असावा बापडा, आणि मग 3 ते 10 मिनिटांत दमून उसासे टाकत हासहुस आवाज काढत तो आला तसा निघून जातो . तिथे हमखास गर्दी वाट पाहताना दिसते.


यलोटोन च्या भूगर्भात अनेक खनिजे आहेत. त्या मुळे कित्येक ठिकाणी हे उसळलेले पाणी खोलगट भागात साठून जागोजागी तळी तयार झालेली दिसतात. मग सुरू होते निसर्गाची किमया. काँपर सल्फेटची निळीशार तळी, आयर्न सल्फेटची हिरवी गार तळी, आणि काही हिरव्याची तपकिरी हो ऊ लागलेली, मध्येच निळे, लाल, हिरवे पटृटे असलेले जमिनीचे तुकडे ...जागोजाग कुठे मृत ज्वालामुखी तर कुठे नुकताच उसळून गेलेला, भळभळणार्या जखमे सारखा ठसकता ज्वालामुखी, तर कुठे निद्रिस्त ज्वालामुखी ..., वाटेत आपल्या सारखेच वेडे पीर, जे जिवावर उदार होऊन हा चमत्कार अनिमिष नेत्रांमधे साठवत हिंडत आहेत. असे एक दोन गृप भेटतात, आणि सांगतात की अमूक तमूक ठिकाणी आत्ताच एक झरा किंवा  ज्वालामुखी उसळला आहे. झालं. कि मग आमचा मोर्चा आम्ही तिथे वळवत असू. जंगलातले गार्ड येण्या पूर्वी एक दर्शन पदरात पाडण्याची घाई. कारण फाँरेस्ट गार्ड ना सुगावा लागला कि लगेचच अशा नव्या किंवा झोपेतून जाग्या झालेल्या झर्या भोवती कुंपण घातले जाते. तिथे सावधानतेच्या सुचनांचे फलक उभे राहतात. तो झरा अजून जागा आहे कि परत झोपी गेला कि शेवटचे दोनचार आचके देऊन धराशायी पडला ह्याचा अंदाज/ अभ्यास केला जातो. मगच तो इतर पर्यटकांना मोकळा करायचा कि नाही हे ठरते.


आम्ही यलोस्टोनला जाण्याच्या पंधरा दिवस आधी (1999), अशा च एका ज्वालामुखी मुळे जंगलाच्या एका भागात वणवा पेटला होता. अथक प्रयत्न व अगदी हेलीकाँप्टर मधून पाण्याचे प्रचंड फवारे सोडून तो १५-२० दिवसांनी आटोक्यात आला. आम्ही गेलो तेव्हा सुरूवातीला तो धुमसताना दिसत असे. पण नंतर दरवेळी त्या रस्याने जाताना ती जळून काळीठिक्कर पडलेली झाडे पाहताना मन विषण्ण होई. का निसर्ग असा स्वतःच्या निर्मितीचा स्वतः च नास करत असेल? अशी कित्येक जंगले निर्माण होत असतील आणि कित्येक अशी आतल्याआत नामशेष होत असतील. ह्या एका जंगलात जायला पाच वेगवेगळ्या राज्यातून रस्ते आहेत. त्यातील आम्ही एकच मार्ग पाहिला. आपल्याला माहित नसलेले कित्येक मार्ग असतील. कित्येक प्राणी पक्षी नामशेष  होत असतील. दुर्मिळ  झाडे हरवत असतील, आणि कित्येक नवीनही जीवसृष्टी निर्माण होत असेल. आपल्या ज्ञाता च्या पलीकडे हे असे कित्येक मौल्यवान ठेवे असतील जे पहायला एक जन्म अपुरा आहे. नुसत्या यलोस्टोनच्या अभ्यासासाठी आयुष्य वाहून घेतलेले कित्येक शास्त्रज्ञ / विद्यार्थी किंवा नुसतेच छंद म्हणून वाहून घेतलेले लोक आम्हाला भेटले. 


 हे तर एक जंगल होते.  अशी कित्येक जंगले असतील  .... आणि अशी अखंड विचारांची मालिकाच आम्हा सर्वांच्या मनात रुंजी घालत होती.कोणी कोणाशी बोलत नव्हते . जाताना सात मजली गडगडाटी हसत, गप्पा मारत, घरातून निघालेले आम्ही सर्वजण परतताना मात्र अंतर्मुख झालो होतो. 

आज वीस वर्षांनी देखील ते जंगल डोळ्यांसमोर परत उभे राहिले. आणि आजही मी परत एकदा नतमस्तक झाले.


©सुवर्णा उपलप

24-Feb-2019


Forest gump (IT आयुष्य )

 Forest gump (IT आयुष्य )


प्रत्येक जण एक फाॕरेस्ट गम्प

सकाळ झाली की धावत सुटतात

कुठे जायचे ? ठाऊक नाही

कधी थांबायचे? ठाऊक नाही

एक दिशा ओळखीची वाटते

उगाचच कधी खुणावते

त्या दिशेने गेले तर

काही तरी मिळेल वाटते 

काय मिळेल? माहित नाही.

कधी मिळेल? माहित नाही.

काय हवे आहे नक्की?

ते देखिल माहित नाही.

रॕट रेस म्हणतात म्हणे?

उंदीर कुठे पळतात का?

पळाले तरी धाव किती?

ह्या कपाटापासून त्या कपाटा पर्यत 

मग नक्की कोणाची प्रेरणा?

कुठून आले असतील जीन्स?

की नुसती एक हाव

पैशाची? प्रतिष्ठेची? अधिकाराची की नुसताच माज?


कि हे पळणे कोणापासून?

घरकामातून मोठीच सुटका

सासुरवासातून मोठीच सुटका

मुलाबाळांचा अभ्यास नको की 

धुणी, भांडी, स्वयंपाक नको 


मुलांच्या व्यस्त आयुष्यातून

जोडीदाराच्या मग्न आयुष्यातून

उरलेली एक. वजाबाकी नको


पण कधीतरी वाटतेच

का पळतो? कशासाठी? कोणासाठी? पुढे काय?


हे तर सगळे गौण प्रश्न 

न पळणार्यांना देखील न सुटलेले.


छे! विचारांचा त्रास होतो.

त्या पेक्षा पळणे सोपे

जेव्हा थांबू तेव्हा थांबू

आला दिवस गेला दिवस

शांत शांत...उद्या परत पळायला जोम!!

आता सगळ्या विचारांचा संप

कारण आम्ही सगळेच फाँरेस्ट गम्प!!!!


- सुवर्णा 

9 Mar 2020

हिंजवडी, कॅब आणि प्रवासी

  हिंजवडी, कॅब आणि प्रवासी हिंजवडी च्या  IT कामगारांना रिक्षा आणि टॅक्सी वाल्यांनी अव्वा च्या सव्वा पैसे लावून अनेक वर्षे लुटले. 1 km यायलां...