हिंजवडी, कॅब आणि प्रवासी
हिंजवडी च्या IT कामगारांना रिक्षा आणि टॅक्सी वाल्यांनी अव्वा च्या सव्वा पैसे लावून अनेक वर्षे लुटले. 1 km यायलां 500 /- 800/- असे. जे काही आकडे मनाला येतील ते हे लोक सांगत. अडला हरी म्हणत लोक नाईलाजानं अडचणीच्या वेळेस त्यात बसत. Pmt ने AC busses चालू केल्या होत्या, पण त्याचे टायमिंग कुठेही बस थांब्यांवर नाही. सगळ्या route वर ह्या गाड्या नाहीत. त्यामुळे ज्या बसेस जातात त्यात लोंबकळत जाण्या शिवाय पर्याय नाही. बऱ्याच कंपनी स्वतः च्या बस services देतात. मात्र ह्या नवीन बस मध्ये देखील इतक्या छोट्या सीट्स आहेत, की फक्त अतिशय बारीक लोकांना त्या सोयीच्या आहेत. उरलेल्या जागा उभे राहून प्रवासासाठी. आता हिंजवडी ला जाणाऱ्या कर्मचारीवर्गा मध्ये 40 वर्षाच्या वरचा बराच वर्ग आहे, जो बस च्या ब्रेक च्या हाद्र्याना सहन करण्याच्या पलीकडे गेला आहे. बसून कामा मुळे अनेकांना गुडघे दुःखी आहे.
जो route pmt साठी अतिशय फायदेशीर असायला हवा, तिथे इतक्या कमी गाड्या आहेत आणि 6 सिटर( ह्यांना 6 सीटर का म्हणावे हा मोठा प्रश्न आहे. कारण एका गाडीत किमान 12 जण कोंबेलेले असतात) मात्र दर 2-3 मिनिटांनी सुटतात. जर सोयीच्या बसून जाता येणाऱ्या बसेस असतील तर हेच लोक बस ने का नाही प्रवास करणार? This is a very good business case for them. कारण काय तर मग 6 seater वाले आंदोलन करणार. जर ह्याच 6 seater वाल्यांना पण pmt च्या ड्रायव्हिंग चे ट्रेनिंग दिले तर ते लोक ही आनंदाने जॉब करतील व लोकांना सोयीच्या बसेस उपलब्ध होतील.
प्रवाशांना कंपनी ची बस चुकली तर दुसरा पर्याय नाही. त्यात रस्ते इतके खराब की स्वतः च्या गाड्या चालवत येणें सर्वानाच जमणे शक्य नाही. बस ची योग्य हमखास बसून 25 km येण्याची सोय नाही त्यामुळे त्यांना हे ॲप बुडत्याला काडीचा आधार ठरले
पण सगळ्याच ॲप मध्ये ride book करण्याच्या सोयी अजून पुरेश्या नव्हत्या. फीडबॅक ची सिस्टीम नीट नाही. ड्रायव्हर ने extra पैसे मागीतले तर तक्रार करण्याच्या सोयी नाहीत.
आता आपण टॅक्सी व रिक्षा कडे वळू. ज्यावेळी टॅक्सी वाल्यांचे व रिक्षा वाल्यांचे extortion चालू होते, हो extortion च, कारण एखादा रिक्षा वाल्यांनी मीटर प्रमाणे यायची तयारी दाखवली, तर बाकीचे युनियन वाले त्याला दमदाटी करत.
त्या नंतर ओला उबर चे दिवस आले. बहुतांश त्रासलेल्या लोकांनी मोकळा श्वास घेतला. कारण आता गाडीत बसण्या पूर्वी तुम्हाला माहित असते की तुम्ही किती पैसे देणार आहात. पटले तर या. मग रपिडो, sride असे अनेक लोक आले. ड्रायव्हर ना आणि प्रवाशांना वेगवेगळे ऑप्शन्स उपलब्ध झाले. पण प्रत्येक बिझनेस मध्ये असते तशी कॉस्ट optimisation ची चढाओढ इथेही सुरू झाली. अनेक ड्रायव्हर्स नी नवनवीन गाड्या घेऊन गब्बर पैसे ही कमावले, शिवाय extra गाडी घेऊन इतर ड्रायव्हर पण कामावर ठेवले. दुसऱ्यांच्या गाडी वर काम करणारे ड्रायव्हर व मालक ह्यांच्या शेअर मध्ये आता चढाओढ होऊ लागली. मग ओला चे भाडे त्यांना परवडेनासे झाले.
मग ह्या लोकांनी आंदोलन केले. Rto ने नियम केला की हे लोक 25/- km प्रमाणे भाडे घेऊ शकतील. पण 25 रू सरसकट की बेसिक काही km नंतर ह्याची, नियमावली नाही. ह्या टॅक्सी ना मीटर नाही. रिक्षाला जर मीटर आहेत तर टॅक्सीला मीटर कम्पल्सरी का नाहीत? मुंबईत मीटर शिवाय टॅक्सी दिसत नाही. मग पुण्यात टॅक्सी लां मीटर का नको?
मीटर लावले तर RTO कडे पण hya गाड्याची नोंद होऊ शकते व टॅक्सी वाल्यांना पण भाडे मिळू शकते. इथेच ग्यांनबाची मेख आहे.
कारण मीटर लावले तर जवळचे भाडे नाकारता येणार नाही. ह्या सर्वांना हिंजवडी, खराडी, मगरपट्टा असे लांबचे IT वाले भाडे हवे आहे. पण ही माणसे शोधायची कशी? त्यामुळे आम्ही ओला किंवा उबर चेच भाडे घेतो हे सांगून जवळ चे भाडे नाकारणे सोयीचे ठरते.
उबर आणि ओला मध्ये सकाळच्या वेळी ऑफिस ला जायचे भाडे येताना च्या भाड्याच्या दीड पट आहे. कारण कमी भाडे घेऊन टॅक्सी वाले इतक्या लांबचे गिऱ्हाईक सोडायला तयार नाहीत. हीच तर कमवायची त्यांची संधी आहे. लोकांना ही मीटिंग ची वेळ गाठायची तर घे बाबा 2 पैसे जास्त पण वेळे वर सोड आम्हाला अशी घाई असते.
पण येताना एकतर ऑफिस सुटे पर्यंत थांबा नाही तर रिकामे परत या, त्यामुळे परत येताना चे भाडे कमी देऊन ही हे लोक यायला तयार होतात.
आता मात्र त्यांना दिसते की उबर सकाळी जास्त पैसे लावते, दुपारी कमी लावते पण दोन्ही वेळेला ड्रायव्हर ल मात्र तेवढेच पैसे मिळतात. त्यामुळे त्यांची ओरड आहे
म्हणजे ओला उबर ड्रायव्हर ना उबर चे गिऱ्हाईक तर हवे आहे पण भाडे मनमानी हवे आहे. शिवाय मीटर पण नको. म्हणजे आखूड शिंगी, बहुदुधी बहु गुणी गाय हवी आहे.
त्यामुळे सद्ध्या टॅक्सी चालकांचा नवीन फंडा आला आहे.
लांबचे गिऱ्हाईक शोधणे जिकिरीचे. त्यामुळे ॲप वर रजिस्टर करायचे. ॲप मार्फत गिऱ्हाईक हेरायचे. मग ॲप मधून च प्रवाशाला फोन करायचा की आणि ॲप प्रमाणे नाही km प्रमाणे पैसे घेऊ. जे आवा च्या सव्वा आहेत. बरं त्यांना विचारले तुमच्या कडे मीटर आहे का? तर नाही. RTO ने meter न लावता गूगल वरची एक बातमी दाखवून आम्हाला मीटर प्रमाणे म्हणजे नसलेल्या मीटर प्रमाणे भाडे घ्यायची परवानगी दिली आहे म्हणे. ह्या केस मध्ये ड्रायव्हर ची credibility किती? बॅकग्राऊंड चेक झाला आहे का? तो माणूस safe आहे का? ह्याची कुठलीच गॅरंटी प्रवाशाला नाही. त्यामुळे गुन्ह्यांचे प्रमाण देखील वाढत आहे. एखादा ड्रायव्हर regular Ola, Uber chya rate ने येतो ही. पण नंतर त्याला बाकीचे लोक धमकवतात व पुढच्या वेळेस तोच ड्रायव्हर extra पैसे मागतो. हे चक्र चालूच आहे. जगजाहीर आहे. मात्र ह्यावर गेल्या अनेक वर्षात कुठलेही ठोस उपाय नाही.
ह्या सर्वावर PMT, RTO, local corporaters, कंपन्या ह्यांनी तोडगा काढायला हवा. टॅक्सी ल पण officially मीटर बसवावे. उबर, ओला rate आणि मीटर मध्ये फार तफावत असता कामा नये, मुख्य म्हणजे बसून प्रवास करता येतील अशा बसेस वाढवांयला हव्यात, AC bus सुद्धा लोक आनंदाने वापरतील पण बसायची सोय हवी. उभे राहून नको
कोणी ह्यावर विचार करतील काय?
- सुवर्णा
- 3-Oct-2025