Saturday, March 26, 2022

Democracy and right of opinion

Today someone forwarded an old video of Atalji's speach during Sharad Pawar's 61st birthday.

Very true opinion. Gone are those days when political leaders used to meet for tea, lunch and dinner. They used to debate on totally opposite views. Atalji very rightly said, " loktantra me matbhed ho sakte hai, koi mitra hota hai, koi mitra nahi hota hai. Lekin shatru koi nahi hona chahiye".(sic) This whole philosophy is now going down the drain. If someone praises Sharad Pawar then those become shatru for someone and mitra for someone. If someone praises Modi, then immediately some mitra become shatru and some not mitra become mitra.


 Democracy has the base of difference of opinions. When one can express a different view freely, then that is the freedom of expression. One can argue about correctness or wrongness of the opinion, debate about it freely. However, when we say you should not speak a word about xyz or you should say only positive or only negative about xyz, it is communism or dictatorship, it is not loktantra, democracy. Democracy brings maturity. Democracy brings patience to hear totally "opposite" opinions and totally "for" opinions which both may not be correct, and democracy gives maturity to debate point by point, about each subpoint and its accuracy. 


Atalji very rightly said that, "the days are coming where everyone is becoming extremist, they either become shatru or mitra There is no patience. Every opinion has to finally have base of priority of Nation ."(Sic) 


Now political parties boycott tea, lunch, dinner arranged by  CM or any opposition party and same is followed by common people. 


Sharad Pawar has friends in every party with whom he eats, talks, debates. May it is Gadkari or Thakre, late Munde, late Pramodji Mahajan or Sonia. But he has his own opinion, agenda, and thought process of running his party and nation. He fights with all  of them on ballet poll not personally.


We are all Indians first and for a better democracy we need to respect each and every opinion. We can try to convince or get convinced. Or sometimes we can be somewhere in between. However, the open discussion should happen in the society. 


Why extremists and terrorists are born? They are not like that from their birth. They become so, over the period because someone or they themselves hammer them with same thought again and again and again. They are taught not to listen to any other view. They are taught that listening or accepting any other view is a sin. As Quran says, "If you listen any thing against Allah or against any view mentioned in Quran, then it is sin and you have right to punish those". This is a thought process to create extrimists by nature. 


The right way to bring back an extrimist from the extreme view, is to listen their views and debate. Give other perspectives to them. Teach them slowly to respect every view, and it is ok to agree to disagree.  This is the right way of democracy. 


Hindusthan or India or Bharat has democracy in its nature. Charcha and samiksha are basic characteristics of Sanatan Dharma. So religion, or caste, or profession or opinion or "ism" are all part of opinion database. What is religion? It is only difference of opinion about some or many principles. 


Jews or christians or muslims are actually same as they follow bible. The only difference christian have from jews is they worship idol, they believe in trinity and they changed some rules about eating habits among few others. The difference between Muslims and christians is again they went back to "no idol worship", again back to some rules of eating habits partially, adding some extreme rules about law, among few others. What hindu dharma says is "everyone has a choice to worship based or their liking, sagun, nirgun, idol, no idol, any day- sunday, monday, tuesday ,.. saturday, post eating , without eating or eating with restrictions, no violence or violence for only self protection." 


We can hear out each other, talk about your own opinion freely, accept or disagree other opinions. The day we say "no more expression of your view", we are already an extrimist or on the path of becoming so. 


-Suwarna

27 Mar2022

Friday, March 18, 2022

एक दिवस आठवड्याचा

एक दिवस आठवड्याचा!!! 

देऊन तर बघा....

इतके तर आपण करूच शकतो. प्रत्येकाच्या सोयीनुसार, सगुण करा की निर्गुण, करा. साकार( कुठल्याही मूर्ती , प्रतीके, प्रतिमा स्वरुपात) करा की निराकार ( प्रकाश,अवकाश, मन स्वरुपात) करा. षोडषोपचारे ( आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान/अभिषेक, वस्त्र, यद्न्योपवित / मंगळसूत्र, अनुलेपन/ गंध - अक्षता, फुले, धूप, दीप/ आरती, नैवेद्य, नमस्कार, प्रदक्षिणा / परिक्रमा, विसर्जन.) करा किंवा  मनापासून हात जोडून नमस्कार  करा. आरती म्हणा किंवा ध्यान (meditation) करा. खाऊन पिऊन करा किंवा फराळ करा किंवा  अगदी निर्जळी उपास करून करा. पूर्णपणे श्रद्धा म्हणून करा किंवा शास्त्र शुद्ध माहिती जाणून घेऊन करा. पोथी वाचून करा, कथा ऐकून करा किंवा इंटरनेटवरून समजून घेऊन करा.


इतके आॕपशन इतके पर्याय, इतके मुक्त हस्ते दिलेले स्वातंत्र्य तर कुठल्याही इतर ठिकाणी नाही. सतत वाहता, उत्क्रमित होणारा हा सनातन (/ पुरातन काळापासून चालत आलेला ) धर्म आहे.


बर्याचदा आपण ऐकतो, अमुक तमुक लोक शनिवारी त्यांच्या  प्रार्थनास्थळी जातात. तमुकतमुक शुक्रवारी जातात. तमुक अमुक रविवारी जातात. आपण मात्र कधीही देवळात जात नाही. फारतर सणावाराला, किंवा  सठी-सहामाशी वाढदिवस किंवा परीक्षेच्या आधी गुपचूप देवळात जाऊन येतो. त्यामुळेच आपण विखुरलेले आहोत.


हे किती छोटे कारण आहे विखुरण्याचे...असेच जर असेल तर चला देऊन बघुया...एक दिवस आठवड्याचा. जिथे असाल तिथल्या देवळात जा, जो पटेल त्या उपचाराने मनापासून नमस्कार तर करून पाहू. वाईट तर नक्कीच काही होणार नाही.


Meditation चे महत्त्व आता शास्त्राने/सायन्सने पण मान्य केले आहे.  आस्तिक माणसांना बरेच शारिरीक व मानसिक आजार होण्याचे प्रमाण कमी असते असे काही चाचण्यांमधून सिद्ध झाले आहे.  आपण लहानपणा पासून पिक्चर मध्ये ऐकत आलेलो आहोत, " अब इसे दवा की नही दुवा की जरूरत है!" यातला गंमतीचा भाग सोडला तरी हा मुद्दा अधोरेखित होतोच.


आता काही लोक युक्तीवाद करतात, नुसता देवधर्म करण्यापेक्षा काही समाज कार्य करा. उत्तम विचार आहे. सवंगडी जमवून ठराविक वारी देवळाचा परिसर स्वच्छ करा. एकही भिकारी देवळाच्या परिसरात दिसणार नाही याची व्यवस्था करण्यासाठी भिकार्यांना करता येण्याजोगे सन्माननीय काम द्या जसे एखादी वस्तू विकणे. उदाहरणार्थ अगदी पेन, पेन्सिल, फुले, किंवा इतर साहित्य वगैरे व सुरुवातीचे भांडवल तुम्ही घाला. फार लागत नाही. शंभर रुपयात पण बरीच फुले येऊ शकतील जे विकून त्या गरीबाला भीक मागण्या पेक्षा  मानाची कमाई मिळवण्याचा मार्ग सापडेल. कुठे छोट्या मुलांना शिकवा. तुमचाच इतिहास , पुराणे वगैरे उजळणी करून नवीन पिढी कडे जाईल. हाती वेळ व उत्साह असेल तर प्रवचने, कीर्तने, व्याख्याने भरवा. अगदी लहान मुलांमध्ये देखील ह्या माध्यमातून एकाग्रता, वक्तृत्व इ. गुण विकसित व्हायला मदत होईल.


बरेचसे धर्म हे एक परिपूर्ण  संस्था रुपी काम करतात. जिथे ह्या ना त्या रुपात लोकसंग्रह, लोकविकास, व त्यातून सामाजिक विकास होत असतो. 


हे सगळे आपण  खूप पूर्वी पासून करत होतोच. आता त्यावर धूळ जमली आहे इतकेच. आपल्याला आपल्या सोईचा वार सुद्धा निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. सोई नुसार गर्दी चे वा बिनगर्दीचे देऊळ निवडण्याचे पण स्वातंत्र्य आहे. त्यामुळे कोणासाठी नाही, तर स्वतः साठीतरी, दहा मिनिटे असू दे वा दोन तास असू देत, आठवड्यातून एक दिवस कुठल्या ही एका देवळा साठी देऊन तर पहा!!!


सुवर्णा उपलप

17-Jan-2020



पुणे आणि ट्रॕफिक

कधी बदलणार?


कधी बदलणार RTO चे रुलबुक? Right of the way, ही संकल्पनाच रुलबुक मध्ये नाही. कसे काय आपण अपेक्षा ठेवू शकतो की सिग्नलला लोक पहिल्यांदा आलेल्याला वाट देतील?


हॉर्न वाजवून गाडी घेतल्याचा आनंदोत्सव साजरा करणाऱ्या लोकांचा हा देश आहे. इथे ट्रकच्या मागे आवर्जून लिहले जाते "हॉर्न, OK, please". आवाजाने प्रदुषण होते ही जाणीव इथे कोसो दूर आहे. इथले ड्रायव्हिंग स्कूलचे इंस्ट्रकटरच गाडी चालवताना सतत हॉर्न वाजवत गाडी कशी चालवावी ह्याचे शास्त्र शुद्ध प्रशिक्षण देतात. वर "हॉर्न न वाजवता समोरचा हलेलच कसा? "ह्यावर त्यांचा ठाम विश्वास असतो. सांगितले तर आपल्याला च वेड्यात काढतात. किती ड्रायव्हिंग स्कूलला आज पर्यंत त्याचे विद्यार्थी गाडी नीट चालवून दाखवू शकले नाहीत म्हणून दंड झाला आहे? त्यांना कधी जबाबदार ठरवणार? (Accountability @ground level ) मूळ दायित्व ड्रायव्हिंग शिक्षण व्यवस्थेलाला च एकदा देऊन बघा.  त्यांना   खोर्याने पैसा मिळतो. मग जबाबदारी पण नको? ते ती जबाबदारी चुकार विद्यार्थ्यांना आतल्या मार्गाने ढकलत ढकलत लायसंस देऊन पूर्ण करतात. 


सद्ध्या वाहन चालकाला शिक्षणाची अट असावी का? ह्यावर प्रचंड चर्चा होत आहे. कारण काय? तर शिकलेले लोकच जास्त अपघात करतात. चुकीचे ओव्हरटेक करणे, उगाच हॉर्न वाजवणे, वाहनांची लांब रांग लागलेली दिसली की आपण कसे हुषारीने निसटू शकतो, असा आगाऊ विचार करुन उलट बाजूने गाडी घुसवून समोरासमोर तासन् तास गाड्या अडकवून ठेवणे व सर्वांना च खोळंबा करणे असे कसब ते दाखवतात. "सायकल व स्कुटर ला वाहतूक नियम पाळण्याची गरज नसते. उलट गर्दी मद्धे premium Rush च्या नायका सारखे कसब दाखवण्या साठीच हे वाहन सुशिक्षित चालकांना दिलेले आहे", अशी यांची ठाम समजूत असते. एका कुशल संगणक अभियंत्याने तर मला आश्चर्याने विचारले " जर दुचाकी घेऊन पण मी लेनबीन पाळायची असेल तर दुचाकीचा काय उपयोग? लवकर (कसेही..हे silent) पोहोचायचे असते म्हणून तर आम्ही दुचाकी घेतो." इथे उच्च शिक्षितांची ही अवस्था तर बाकीच्यांचे काय?


"अहो पुण्यात ट्ँफिक रुल वगैरे असे काही नसते. (भ्रम आहेत हे.. हे मनात)" असे तर शेंबड्या पोरापासून ते सुरकुतलेल्या आजोबां पर्यंत कोणीही ठणकावून ऐकवत असतो. 


हेल्मेट..हा तर काश्मीर इतकाच जुना प्रश्न आहे. आणि जशी काश्मीर प्रश्नावर  अनेक दुकाने वर्षानुवर्षे चालू आहेत तशी पुणे आणि हेल्मेटवर आहेत. (पूर्वी मेट्रोचा ही नंबर आधेमधे पुढे यायचा पण आता तो जरा मागे पडला आहे.) तर  हेल्मेट सक्ती आधी की बाकीचे ट्र्ँफिकचे नियम आधी हा स्वातंत्र्य आधी की सुराज्य आधी इतकाच गहन मुद्दा आहे. 


त्यामुळे ट्र्ँफिकरुल बुक एकदा नव्याने लिहायला घ्याच, अशी माझी समस्त धुरीणांना नम्र विनंती आहे.


- सुवर्णा उपलप.

1-Jul-2019

Yellowstone यलो स्टोन एक आठवण

 अमेरिकेतील जंगलांमध्ये हिंडताना प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे जंगल संवर्धन करताना तेथील नैसर्गिक अधिवास जपण्याचे विविध एनजीओंमुळे आणि सरकारी शिस्तीने सुरु असलेले प्रयत्न.


जंगलात जाण्यापूर्वी नोंद करावी लागते . प्राणी आणि माणसे दोन्हींच्या सुरक्षे साठी पुरेपूर काळजी घेतली जाते. प्राण्यांच्या वावराच्या, येण्या जाण्याच्या वेळा दिलेल्या असतात. त्यांना खायला घालू नये. जवळ जावू नये अशा वेगवेगळ्या सूचनांचे पत्रक तिकीट काढल्यावरच लगेच  हाती पडते.


तुम्हाला जंगलात मुक्काम करायचा असल्यास स्वतंत्र संरक्षित ठिकाणी काही मूलभूत सोई दिलेल्या असतात. जिथे सुरक्षा रक्षक जवळ च्या अंतरावर असतात. मात्र दिवसा  जंगलात हिंडताना जो इतर कुठल्याही जंगलात असतो तो धोका  आपण पत्करुनच जावे लागते. 


मात्र तेथे आढळणारे प्राणी पक्षी यांची माहिती बरोबर माहितीपत्रकात असल्याने जेव्हा कुठलाच प्राणी दिसत नसतो तेव्हा वाचायला सोय होते.  अमेरीकेचा 36% भूभाग हा जंगलांनी व्यापला आहे, म्हणजे सुमारे ३३.१३ लक्ष चौरस किमी. जगभरात झाली तशी अमेरीकेत ही खूप जंगलतोड झाली. २00५ साली जुन्या वाढलेल्या  प्राचीन  जंगलांचा नाश झालेल्या प्रमुख देशांत अमेरीकेचा सातवा क्रमांक लागला होता.  मात्र स्थलांतरीत लोकांचे ओघ जसे वाढत गेले तसे मानवी अधिवासासाठी जंगलतोड जगभरात आणि त्यातल्या त्यात उद्योग, शिक्षण व नोकरी या संधी उपलब्ध असलेल्या देशाः मधे मोठ्या प्रमाणात झाली.


तिथे टोंगास, चुगाच,हुम्बोल्ट. गिफर्ड पिंछो . यलो स्टोन अशी अनेक राष्ट्रीय जंगले  आहेत. जंगलात जिथून लांबून प्राणी, पक्षी, विविध झाडे, त्यांचे  फुलण्याचे बहर, कालपरत्वे दिसू शकतील हे विचारात घेऊन रस्ते बांधलेले आहेत. त्यामुळे एक दोन कुटुंबे  किंवा 6-7 जणांचा गृप असे  जंगल सफारीला जाऊ शकतात. या जंगलांमध्ये गेले तर मैलोंमैल रस्ते सुरस आणि चमत्कारिक गोष्टीचा खजिना जागोजाग दाखवतात.


आम्हाला यलोस्टोनच्या नँशनल पार्कमध्ये १०-११ दिवस राहण्याचा योग आला होता. व्योमिंग. इडाहो आणि माँटाना ह्या ३ राज्यात मिळून  3.5 चौरस मैल पसरलेल्या ह्या जंगलाचे पाहण्यासाठी प्रामुख्याने पाच भाग पडतात.


गरम  पाण्याचे झरे व फवारे. ( geysers and hot springs),जंगली प्राणी आणि पक्षी, झाडोरा आणि प्रत्येक ऋतुतील भिन्न रंग संगती, ग्रॕँड कँनियन चा प्रदेश व ट्रेकिंग/ गिर्यारोहणाचे प्रदेश.


प्रामुख्याने ओल्ड व्हिलेज, ग्रँट व्हिलेज, मँमथ व्हिलेज. लेक व्हिलेज आणि कँनियन व्हिलेज असे भौगोलिक भाग आहेत. प्रत्येक भागात वेगळे प्राणी व वेगळे भू प्रकार दिसतात. 


यलोस्टोनची ग्रँड कँनियन ही अमेरीकेतील चौथ्या क्रमांकाची मोठी दरी आहे. जिथे यलोस्टोन चा दोन पैकी पहिला धबधबा आहे. जो उंची ने सर्वात उंच असलेल्या पहिल्या काही धबधब्यामध्ये गणला जातो. त्या धबधब्याच्या वरच्या भागातून खाली पाहताना आपण निसर्गाच्या अफाट निर्मिती मधले किती क्षुल्लक प्राणी आहोत ह्याची जाणीव आत खोल पर्यत होते. निःशब्द अनुभूती घेणे एवढेच काय ते हाती उरते, आणि वरून खाली वाकून पाहणे हा तितकाच भयावह अनुभव की त्या उंचीने भोवळ यावी.


अमेरिकन ग्रीझली बिअर - काळी अस्वले हे यलो स्टोन चे वैशिष्ट्य . करडे पांढरे असे बर्फात लपून जाणारे नाँर्थवेस्टर्न लांडगे, जर लक्ष नसेल तर क्षणार्धात इथून तिथे जाऊन लुप्त होणारे.  रानगवे आणि अमेरिकन रानगवे, आणि हरणे तर पुढेपुढे इतके  दिसू लागतात कि चारपाच दिवसांनंतर आपण हे रानगवे पहात च मोठे झालो आहोत असे वाटू लागते. ते अजस्त्र आणि बर्यापैकी निर्बुद्ध दिसणारे धूड किंवा धुडांचे लोंढेच्यालोंढे विधात्याने,काय विचार करून जन्माला घातले असावेत असा क्षणोक्षणी प्रश्न पडतो. मूस, एल्क, आँटर, कोल्हे हे मात्र क्वचित दर्शन देऊन मानवाच्या चाहुलीने घाबरून लपत पळणारे प्राणी. ह्याच बरोबर पिनटेल, गडवाँल, मँगपाय, कँनडा गूस आणि अगणित प्रकारचे पक्षी डोळ्यांचे पारणे फेडतात. 


पण ह्या सर्वांपेक्षा यलोस्टोन चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे  गिझर्स. गरम पाण्याचे अगणित झरे आणि फवारे. यलोस्टोन जंगला च्या परिसरात पृथ्वीचा जमिनीचा थर  कित्येक ठिकाणी  इतका पातळ झाला आहे कि कधी अचानक तुम्ही उभ्या असलेल्या जमिनीखालून जमीन दुभंगून भूगर्भातील गरम पाणी किंवा लाव्हारस उसळून बाहेर पडेल आणि आजूबाजूच्या प्राणी वनस्पतींचा क्षणात जळून कोळसा होईल हे कोणी च सांगू शकत नाही.  पण निसर्गाचा नैसर्गिकपणा तो हाच. त्याला तितक्याच श्रद्धेने आधीन होऊन सामोरे गेलो तरच हे असे अनघड रोमांच अनुभवास येणार.


ओल्ड फेथफुल हा धबधबा 1870 सालापासून दर 90 मिनिटांनी वर उसळतो. वर्षानुवर्षे हे अव्याहत चालू आहे. 106 मी पासून सुरू होत साधारण 185 मी पर्यत उंच जात राहतो. त्या विधात्याला स्पर्श करू पहात असावा बापडा, आणि मग 3 ते 10 मिनिटांत दमून उसासे टाकत हासहुस आवाज काढत तो आला तसा निघून जातो . तिथे हमखास गर्दी वाट पाहताना दिसते.


यलोटोन च्या भूगर्भात अनेक खनिजे आहेत. त्या मुळे कित्येक ठिकाणी हे उसळलेले पाणी खोलगट भागात साठून जागोजागी तळी तयार झालेली दिसतात. मग सुरू होते निसर्गाची किमया. काँपर सल्फेटची निळीशार तळी, आयर्न सल्फेटची हिरवी गार तळी, आणि काही हिरव्याची तपकिरी हो ऊ लागलेली, मध्येच निळे, लाल, हिरवे पटृटे असलेले जमिनीचे तुकडे ...जागोजाग कुठे मृत ज्वालामुखी तर कुठे नुकताच उसळून गेलेला, भळभळणार्या जखमे सारखा ठसकता ज्वालामुखी, तर कुठे निद्रिस्त ज्वालामुखी ..., वाटेत आपल्या सारखेच वेडे पीर, जे जिवावर उदार होऊन हा चमत्कार अनिमिष नेत्रांमधे साठवत हिंडत आहेत. असे एक दोन गृप भेटतात, आणि सांगतात की अमूक तमूक ठिकाणी आत्ताच एक झरा किंवा  ज्वालामुखी उसळला आहे. झालं. कि मग आमचा मोर्चा आम्ही तिथे वळवत असू. जंगलातले गार्ड येण्या पूर्वी एक दर्शन पदरात पाडण्याची घाई. कारण फाँरेस्ट गार्ड ना सुगावा लागला कि लगेचच अशा नव्या किंवा झोपेतून जाग्या झालेल्या झर्या भोवती कुंपण घातले जाते. तिथे सावधानतेच्या सुचनांचे फलक उभे राहतात. तो झरा अजून जागा आहे कि परत झोपी गेला कि शेवटचे दोनचार आचके देऊन धराशायी पडला ह्याचा अंदाज/ अभ्यास केला जातो. मगच तो इतर पर्यटकांना मोकळा करायचा कि नाही हे ठरते.


आम्ही यलोस्टोनला जाण्याच्या पंधरा दिवस आधी (1999), अशा च एका ज्वालामुखी मुळे जंगलाच्या एका भागात वणवा पेटला होता. अथक प्रयत्न व अगदी हेलीकाँप्टर मधून पाण्याचे प्रचंड फवारे सोडून तो १५-२० दिवसांनी आटोक्यात आला. आम्ही गेलो तेव्हा सुरूवातीला तो धुमसताना दिसत असे. पण नंतर दरवेळी त्या रस्याने जाताना ती जळून काळीठिक्कर पडलेली झाडे पाहताना मन विषण्ण होई. का निसर्ग असा स्वतःच्या निर्मितीचा स्वतः च नास करत असेल? अशी कित्येक जंगले निर्माण होत असतील आणि कित्येक अशी आतल्याआत नामशेष होत असतील. ह्या एका जंगलात जायला पाच वेगवेगळ्या राज्यातून रस्ते आहेत. त्यातील आम्ही एकच मार्ग पाहिला. आपल्याला माहित नसलेले कित्येक मार्ग असतील. कित्येक प्राणी पक्षी नामशेष  होत असतील. दुर्मिळ  झाडे हरवत असतील, आणि कित्येक नवीनही जीवसृष्टी निर्माण होत असेल. आपल्या ज्ञाता च्या पलीकडे हे असे कित्येक मौल्यवान ठेवे असतील जे पहायला एक जन्म अपुरा आहे. नुसत्या यलोस्टोनच्या अभ्यासासाठी आयुष्य वाहून घेतलेले कित्येक शास्त्रज्ञ / विद्यार्थी किंवा नुसतेच छंद म्हणून वाहून घेतलेले लोक आम्हाला भेटले. 


 हे तर एक जंगल होते.  अशी कित्येक जंगले असतील  .... आणि अशी अखंड विचारांची मालिकाच आम्हा सर्वांच्या मनात रुंजी घालत होती.कोणी कोणाशी बोलत नव्हते . जाताना सात मजली गडगडाटी हसत, गप्पा मारत, घरातून निघालेले आम्ही सर्वजण परतताना मात्र अंतर्मुख झालो होतो. 

आज वीस वर्षांनी देखील ते जंगल डोळ्यांसमोर परत उभे राहिले. आणि आजही मी परत एकदा नतमस्तक झाले.


©सुवर्णा उपलप

24-Feb-2019


Forest gump (IT आयुष्य )

 Forest gump (IT आयुष्य )


प्रत्येक जण एक फाॕरेस्ट गम्प

सकाळ झाली की धावत सुटतात

कुठे जायचे ? ठाऊक नाही

कधी थांबायचे? ठाऊक नाही

एक दिशा ओळखीची वाटते

उगाचच कधी खुणावते

त्या दिशेने गेले तर

काही तरी मिळेल वाटते 

काय मिळेल? माहित नाही.

कधी मिळेल? माहित नाही.

काय हवे आहे नक्की?

ते देखिल माहित नाही.

रॕट रेस म्हणतात म्हणे?

उंदीर कुठे पळतात का?

पळाले तरी धाव किती?

ह्या कपाटापासून त्या कपाटा पर्यत 

मग नक्की कोणाची प्रेरणा?

कुठून आले असतील जीन्स?

की नुसती एक हाव

पैशाची? प्रतिष्ठेची? अधिकाराची की नुसताच माज?


कि हे पळणे कोणापासून?

घरकामातून मोठीच सुटका

सासुरवासातून मोठीच सुटका

मुलाबाळांचा अभ्यास नको की 

धुणी, भांडी, स्वयंपाक नको 


मुलांच्या व्यस्त आयुष्यातून

जोडीदाराच्या मग्न आयुष्यातून

उरलेली एक. वजाबाकी नको


पण कधीतरी वाटतेच

का पळतो? कशासाठी? कोणासाठी? पुढे काय?


हे तर सगळे गौण प्रश्न 

न पळणार्यांना देखील न सुटलेले.


छे! विचारांचा त्रास होतो.

त्या पेक्षा पळणे सोपे

जेव्हा थांबू तेव्हा थांबू

आला दिवस गेला दिवस

शांत शांत...उद्या परत पळायला जोम!!

आता सगळ्या विचारांचा संप

कारण आम्ही सगळेच फाँरेस्ट गम्प!!!!


- सुवर्णा 

9 Mar 2020

Saturday, March 5, 2022

Break the bias


अख्ख्या जगभरातील एक खूप मोठा  एकांगी उपक्रम.

UN मधील महिला ठरवतात की तुमचा ह्या वर्षी चा महिला दिनाचा विषय काय असेल. सगळ्या जगभरातील कंपन्या, महिलांच्या संस्था त्यांचा अजेंडा राबवतात. 


काय आहे ह्या वर्षीचा अजेंडा? तर आपपरभाव कमी करा. दोन माणसांमधली दरी कमी करा. प्रत्येक माणसातील वेगळेपणा समजून घ्या. त्यातूनही ती स्त्री असेल तर तिला अधिकच दुजाभाव मिळतो. तो कमी करा. किती उदात्त हेतू!!


पण मग प्रत्येक कंपनीचे महिला दिनाचे पोस्टर पाहिले तर काय लक्षात येते? 5 ते 7 महिला, ज्यात मध्यभागी एक हिजाब धारी महिला असेल. मग आजूबाजूला इतर 4-6 चित्रे. एक अफ्रिकन/ कृष्णवर्णीय महिला, एखादी शाॕर्ट घातलेली महिला, bias  हा शब्द आला की Times group ला प्रकर्षाने दिसणारा LGBT गट आणि त्यांचे सदस्य, मग एक- दोन जागा उरल्या असतील तर लाल किंवा काळे केस असलेल्या शर्ट पँट किंवा टी शर्ट जीन्स घातलेल्या एक- दोन महिला.  हाच एक साचा दिलेला आहे, आणि सर्व IT कंपन्यांनी तो उचललेला आहे.


मुळात आत्ता आत्ता पर्यंत IT कंपन्यांमधे बिझिनेस फाॕर्मल   घालणे देखील बंधनकारक होते.   कस्टमर (ग्राहक म्हणणे ह्या IT विषयात बसत नाही म्हणून मुद्दाम कस्टमर) च्या ठिकाणी तुमची नेमणूक असेल तर फाॕर्मल अगदीच बंधनकारक असत. फाॕर्मल कशाला म्हणायचे? तर जे कपडे तुम्ही औपचारिक प्रसंगी घालता, जसे लग्न समारंभात, किंवा  एखादे नाश्ता (breakfast) दुपारचे भोज  आयोजित केले असेल किंवा सरकारी कामकाजाला जाताना घालायचे  कपडे. म्हणजे मुख्यत्वे काळा व पांढरा रंग असलेला पोशाख, कारण इंग्रज लोक हे प्रत्येक प्रसंगाला वेगळा पोशाख घालत. सकाळच्या नाश्त्याला, दुपारच्या जेवणासाठी, लग्नसमारंभासाठी व संध्याकाळचे जेवण्यासाठी. आणि त्यांचे जिथे जिथे राज्य होते तिथे प्रत्येक ठिकाणी हा पोशाख फॉर्मल म्हणून प्रसिद्ध झाला, राबवला गेला.


आता इंग्रजांच्या बरोबर व्यवहार करायचा, बिझनेस-व्यापार करायचा तर आपण फाॕर्मल दिसले पाहिजे. त्यामुळे आपोआपच समोरचा माणूस जास्त स्वाभाविक (कम्फर्टेबल) होतो आणि आपला पुढील संवाद हा सुखकर होतो. कंपन्यांमध्ये ड्रेस कोड लावण्यामागे ही एक मोठी कारणमीमांसा होती. IT कंपन्यांच्या सुरूवातीच्या काळात,  IT उद्योगाच्या  उदयात dress code चा मोठा वाटा आहे.


 मग पुढे कधीतरी लक्षात आलं की हे "बायस" आहे, ( लादलेला, दुजाभाव, व्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला आहे.) आणि अमेरिकेत वगैरे लोकांनी ड्रेस कोड विरुद्ध आवाज उठवला. जीन्स आणि टी शर्ट   का नाही घालायचा? तो अंगभर सभ्य पोशाख नाही का? मग हळूहळू फ्रायडे कॅज्युअल झाले.( म्हणजे आठवड्यातून एकदा जीन्स घालू शकता, इतके, की जीन्स हाच शुक्रवारचा  बंधनकारक पोशाख झाला.  नंतर तर अमेरिकेतील बऱ्याचशा कंपन्यांनी फॉर्मल घालण्याची बंदीच काढून टाकली. हळूहळू हे लोण भारतातही आले आणि भारतातही फॉर्मल चे नियम शिथिल झाले.


 बायकांनी सुरुवातीला आवाज उठवल्यावर भारतातल्या ऑफिसमध्ये तरी तुम्ही सलवार-कमीज किंवा साडी नेसून येऊ शकता असे ठरवले गेले. त्यातही हे सलवार-कमीज किंवा साडी फार रंगीबिरंगी नसावी, मोठ्या फुलांची नसावी असे नियम सांगितले गेले. गेल्या दोन वर्षांमध्ये लाॕक डाऊन मुळे फॉर्मलच काय, लोकं घरच्या पजामा मध्ये आणि गाऊन मध्ये काम करत होते. तरीदेखील आयटी कंपन्यांना आणि ऑनलाईन काम करणाऱ्या लोकांच्या बिजनेस मध्ये कुठलाही फरक पडला नाही. त्यामुळे व्यापारासाठी अमुक एक पोशाख हा नियम पूर्ण फोल ठरला.


 आता बघू या की अचानक हा बायस (bias) कुठून आला? भारतामध्ये अचानकच हिजाब घालायची मोहीम सुरू होते. त्याच्याविरुद्ध आंदोलनं होतात आणि असं लक्षात आणून दिले जाते  की जे कोणी  हिजाब घालतात त्यांच्याविरुद्ध लोकांचे मत चांगले नाही. त्यांना दुजाभावाने वागवले जाते.  मग भारतभर एक अजेंडा राबवला जातो. भारतभर म्हणण्याचं कारण असे  की त्याच वेळी जगभरातल्या मुस्लिम महिला मात्र टीव्हीवर किंवा इतर समारंभात, प्रवासात कुठे ही हिजाब घालताना दिसत नाहीत. अगदी युक्रेन मधून परत आलेल्या मुस्लिम मुली देखील हिजाब चा अट्टाहास करताना दिसत नाहीत.  मग हे भारतातच का? कारण त्याचा अजेंडाच वेगळा आहे.


 भारतामधल्या आयटी कंपन्यांमध्ये क्रिसमस च्या सुमाराला बऱ्याच ठिकाणी आठवडाभर सुट्टी दिली जाते. याचे कारण जगभरातल्या कंपन्यांना त्या काळात सुट्टी असते. कारण ते ख्रिश्चन आहेत. ख्रिसमस साजरा करतात, आणि ख्रिसमस साजरा करण्यासाठी सुट्टी घेऊन प्रवासाला वगैरे जातात. स्वतः चे सण साजरे करणे हे त्यांचे किती कौतुकास्पद आणि उदात्त विचार आहेत!! त्यांना सुट्टी हवीच.


 मग हा क्रिसमस सगळ्या कंपन्यांनी आपापल्या भारतातील शाखेमध्ये देखील जोरदार साजरा करायला हवा म्हणून आयटी मधील HR ( ह्यूमन रिसोर्सेस  डिपार्टमेंट) त्यासाठी कार्यरत असतात. त्या निमित्त वेगवेगळ्या स्पर्धा भरवल्या जातात. डेकोरेशन केले जाते. क्युबिकल डेकोरेशन केले जाते. बिल्डिंग सजवली जाते. कॅन्टीन मधले पदार्थ आणि सजावट लाल - हिरवी दिसायला लागते.


 मात्र हे करताना गेल्या कित्येक वर्षात हळूहळू याच कंपन्यांमधील दिवाळीच्या सुट्ट्या मात्र कमी कमी होत चालल्या आहेत. पूर्वी तीन दिवस सुट्टी असे. कारण दिवाळी चार-पाच दिवसाची तरी असतेच. मग हळू हळू 3 चे 2 झाले. मग गेली दोन वर्षे एकच दिवस सुट्टी मिळत  आहे. अजून काही वर्षांनी ती सुट्टी देखील ऑप्शनल ( पर्यायी ) म्हणून दिली जाईल. 


आयटी कंपन्यांमध्ये मुस्लिम बांधवांसाठी दिवसातून दोन तीन वेळेला अनेक कंपन्यांमध्ये नमाज पढण्याची वेळ, सोय असते. कारण त्यांच्या धर्मात तसे सांगितले आहे. मग हे लोक अर्धा तास ते एक तास गायब होतात. त्यात काही काळ कामाचा खोळंबा होतो. पुढे कारण असे दिले जाते की ते लोक नंतर ते काम पूर्ण करतात. त्यामुळे त्यांना ती सुट्टी देणे योग्य आहे. शुक्रवार असेल तर दोन दोन तास हे कर्मचारी नमाजच्या निमित्ताने बाहेर जातात. मात्र अशा सुट्ट्या इतर धर्मियांना मिळत नाहीत. हिंदूंना तर नाहीच नाही.


 किती आयटी कंपन्यांमध्ये गणपती बसतो? किती आयटी कंपन्यांमध्ये गणपतीच्या वेळेला, गणपती उत्सवा शी संबंधित काही स्पर्धा सजावट केली जाते? खूप कमी. अगदीच मराठमोळी  कंपनी असेल तर थोडेफार सण साजरे केले जातात. नाहीतर मूर्ती पूजा वगैरे ऑफिसमध्ये करणं हे ऑफिस च्या सभ्यतेत बसत नाही. पण मग नमाज पढणे किंवा क्रिसमस चे डेकोरेशन करणे, किंवा सिक्रेट सान्ता साजरा करणे, हे मात्र खूप पुढारले पणाचे लक्षण आहे असे ठासवले जाते. त्यामध्ये ऑफिसची सभ्यता आड येत नाही.


 आता जर असा विचार केला तर या सगळ्या बायस मध्ये हिंदू मनुष्य आणि त्यातल्या त्यात हिंदू स्त्री यांना कुठेही मनुष्य म्हणूनच स्थान नाही, तर त्यांच्या विचारांना, सणांना, पोषाखांना कुठले स्थान मिळणार?  कुठल्याही " ब्रेक द बायस" च्या चित्रामध्ये साडी, सलवार-कमीज, ठळक कुंकू लावलेली बाई नाही. तिने कुंकू लावले काय, नाही लावले काय, ती काम कसं करते याला जास्त महत्त्व आहे. त्यामुळे ते वेगळे कशाला दाखवायचे? तरीही तिच्या साडीला, तिच्या कुंकवाला कुठेही बायस मधे जागा नाही.(पण हा न्याय हिजाबला मात्र नाही.) 


 फॉर्मल ची व्याख्या जर बघितली तर आपले लग्न समारंभ, भोजन समारंभ किंवा  मग कुणाकडे जाण्यायेण्याच्या प्रसंगी, औपचारिकरीत्या घालायचे कपडे. हे खरंतर भारतात रंगीत च असतात. काळे पांढरे कपडे हे आपण मुख्यतः शोकाच्या प्रसंगी घालतो. मग काळे पांढरे कपडे न घालणं किंवा रंगीत कपडे घालणं हे बिझनेसच्या विरुद्ध का बरं असेल? भारतातच इतकी विविधता आहे. एखादी घागरा घातलेली स्त्री एखाद्या IT कंपनीच्या बिझनेस मिटिंगला मोकळे पणाने बसु शकेल? किमान दक्षिण  भारतीय  वस्त्र नेसलेल्या बायका? 


 धोतर घातलेला पुरुष किंवा साडी नेसलेली बाई हे बिझनेस करू शकत नाहीत. का ? गेल्या दोन अडीच हजार वर्षांपूर्वी पर्यंत  जेव्हा भारत एक महासत्ता होता तेव्हापासून ते अगदी ब्रिटिशांचे राज्य येईपर्यंत भारतात जे काही व्यापारउदीम झाले ते काय शर्ट पॅन्ट घालून झाले? मग हा फाॕर्मल चा अट्टाहास कशासाठी? प्रश्न फॉर्मल्स चा नाही. ज्याला जे आवडेल ते त्यांनी घालावे.


 हा प्रश्न अचानक आला कारण या प्रत्येक चित्रांमध्ये मध्यभागी हिजाब घातलेली स्त्री आहे, पण हिंदू स्त्री मात्र हद्दपार केलेली आहे.  


हिजाब घालून आत्तापर्यंत भारतातही स्त्रिया फारशा दिसत नसत. अचानक तो भारतीय लोकांचा पेहराव कसा झाला? अचानकच सगळ्या  आयटी कंपन्यांमधील मुस्लिम लोकांनी दाढ्या वाढवणे, टोप्या घालून येणे, कसे सुरू झाले?  काही लोक तर पांढरे डगले घालून येऊ लागले. हे कसे सुरु झाले? का झाले?


 मग हे सगळं करताना मुळातला जो भारतीय मनुष्य आहे, हिंदुस्थानातील माणूस आहे,  त्याचा पेहराव कुठे गेला? हिंदू स्त्री चा पेहराव, तिचं अस्तित्व, तिचे सलवारकुरते, साडी, सण वार कुठे गेले? याच्यावर कुठलेच आंतरराष्ट्रीय इव्हेंट/ इनिशिएटिव्ह भाष्य करताना दिसत नाहीत.


 त्यामुळे मुळात ब्रेक द बायस हाच पूर्णपणे बायस्ड (biased) कार्यक्रम आहे. त्यामुळे त्याच्यावर मुळापासूनच बहिष्कार टाकायला हवा. प्रत्येक भारतीयाने, प्रत्येक भारतीय स्त्री ने, आत्मपरीक्षण करून आपण खरंच ह्या ब्रेक दा बायसचा भाग आहोत का? याचा विचार करावा. एक भारतीय स्त्री म्हणून माझा आंतरराष्ट्रीय स्त्री दिनाच्या या बायस्ड "ब्रेक द बायस" उपक्रमाला पूर्णपणे विरोध आहे.


-सुवर्णा

4 - Mar- 2022

हिंजवडी, कॅब आणि प्रवासी

  हिंजवडी, कॅब आणि प्रवासी हिंजवडी च्या  IT कामगारांना रिक्षा आणि टॅक्सी वाल्यांनी अव्वा च्या सव्वा पैसे लावून अनेक वर्षे लुटले. 1 km यायलां...